August 8, 2026

गुटख्याविरुध्द नाशिक ग्रामीण पोलिसांचे अभियान

0

 nnnnनाशिक :  ग्रामीण पोलीसांनी इगतपुरी व घोटी या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपयांचा गुटखा पकडून मोठी कारवाई केली होती. सदरचा गुटखा हा मुंबई आग्रा महामार्गावरुन मुंबईकडे जात असतानाnnपकडण्यात आला होता. उपरोक्तप्रमाणे गुटख्याचा आंतरराज्य व्यापार करणाच्या दोन मोठ्या टोळ्यांवर कारवाई केल्यानंतर, नाशिकnnग्रामीण पोलिसांनी जिल्हांतर्गत वितरण व विक्री करणाऱ्या गुटखा व्यावसायिकांबर आपले लक्ष केंद्रित केले आहे.nnनाशिक ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेले हे विशेष अभियान दिनांक ०६ जून, ते दिनांक ३० जून, २०१३ दरम्यान राबविण्यात येणार आहे. काल दिनांक ०६ जून रोजी पोलीस मुख्यालयाकडील विशेष पथकांनी जिल्ह्यातील सटाणा, घोटी, मनमाड, मालेगाव कॅम्प व अभोणा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुटख्याची साठवणूक व विक्री करणाऱ्या पाच पानपट्टी चालकांविरुध्द कलम ३२८, १८८ २७२ २७३ भा.द.वि. सह कलम ३० (२) (अ) आ, अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ प्रमाणे कारवाई करून, त्यांच्याकडून एकूण १.०५.४६६/- रुपयाचा गुटखा मुद्देमाल जप्त केलेला आहे. उपरोक्त गुन्हयातील अटक केलेल्या पाचही आरोपीताना माननीय न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीनnnदिवसांपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, संबंधित पोलीस ठाणेचे तपासी अंमलदार पुरवठादारांचा शोध घेत आहेत.nnउपरोक्तपणे कलम ३२८ भा.द.वि. खाली दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीताना दहा वर्षापर्यंत शिक्षा व द्रव्य दंड होऊ शकतो. याशिवाय, यातील इतर कलमांना आणखी वेगळी शिक्षा देखील होऊ शकते.nnनाशिक ग्रामीण घटकातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी नव्याने बारा पथके गठीत करण्यात आलीnnअसून, त्यांच्याकडून तसेच स्थानिक पोलीस ठाणेकडून सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू आहे.nnकॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी गुटख्याविरुध्द व्यापक मोहीम उघडली असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व पान टपच्या किरकोळ विक्रेत्यांची दुकाने यासह गुटख्याची साठवणूक करणाऱ्या सर्व ठिकाणांची व वाहतूक करणाच्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी दिले आहेत.nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *