मन व शरीराला स्वस्त ठेवण्यासाठी राजयोगा मेडिटेशन आवश्यक
नाशिक रोड – मन व शरीराला स्वस्त ठेवण्यासाठी राजयोग मेडिटेशन अतिशय उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. अध्यात्मिकतेनुसार बघितल्यास आत्म्याचे परमात्मा सोबत मिलन करण्यासाठी राज योगाचे महत्त्वाचे स्थान आहे. राजयोगाद्वारे आपल्यामध्ये चांगल्या संस्कारांची रुजवण करता येऊ शकते. आज समाजात सर्वच स्तरामध्ये ताण-तणाव वाढला आहे लहान मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ताण-तणावाची छाया दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने राजयोगा मेडिटेशन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सिन्नर महोदरी परिसरातील ब्रेव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ठेवण्यात आलेल्या योग दिवस कार्यक्रम प्रसंगी केले. आपल्या वक्तव्यात दीदींनी विविध बोधपर कथांनी विद्यार्थ्यांमध्ये एकता कशी राखता येईल व लोभ कसा करू नये याची शिकवण दिली.nकार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दीदी उपस्थित होत्या. सोबत योगशिक्षक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी म्युझिकल योगाद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक योगाचे धडे दिले. कार्यक्रम प्रसंगी स्कूलच्या संचालिका मीनल येवलेकर यांनी स्मृतीचिन्ह देऊन दीदींचा व आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला. स्कूलचे चेअरमन विनस वाणी यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सफल नियोजन स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना पगारे यांनी केले याप्रसंगी उपप्राचार्य मनीषा सावखेडकर स्पोर्ट कॉर्डिनेटर वैशाली मोडवे व खंडेराव घुगे आधी शिक्षक वृंदांनी मोलाचे सहयोग दिला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी योग साधने द्वारे भारतीय संस्कृतीची ओळख करून घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रेव संभवी पटेल या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. तर ब्रेव प्रफुल कुमार या विद्यार्थ्याने हिंदीतून योग दिवसावर भाषण केले.
