माळी समाजाचा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव ६ ऑगस्टला ……
नाशिक : माळी समाज सेवा समितीची बैठक रविवारी दि.(२५) रोजी सकाळी श्रद्धा लॉन्स गणेशवाडी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.या बैठकी मध्ये सुरवातील माळी समाजाचे ज्येष्ठ नेते व हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष कै.उत्तमराव(मामा) तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
n
सुरवातील माळी समाज सेवा समितीच्या कार्यकारणीची फेररचना करण्याबरोबर नवीन युवकांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली असून लवकरच नवीन कार्यकारिणीची देखील घोषणा करण्यात येणार आहे.या सोबत माळी समाजाचा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवारी ६ ऑगस्ट २०२३ आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. माळी समाजातील हुशारगुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी समितीच्या वतीने १ ली ते १२ वी , बी.कॉम , एम.कॉम, डी.एड,बी.एड, डिप्लोमा ,इंजिनीरिंग,डॉक्टर ,सीए अश्या सर्व वर्षातील सर्व विभागातील ७५% पेक्षा जास्त मार्क असलेल्या व विविध राष्ट्रीय ,राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरण्यात आले असून १ ऑगस्ट पर्यंत गुणपत्रकाची प्रत माळी समाज सेवा समितीचे कार्यालय ४६१०.जुना आडगाव नाका पंचवटी नाशिक या पत्यावर अथवा ९५७९३८५९०९ या WHATSAPP नंबरवर नाव,पत्ता फोन नंबर ,इयत्ता ,शाळेचे नाव,गुण इत्यादी माहिती पीडीएफ स्वरुपात पाठवावी.तारखेनंतर कोणत्याही प्रकारची नावं स्वीकारली जाणार नाही अशी माहिती माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी दिली.
n
बैठकी मध्ये प्रभाकर क्षीरसागर,मयूर मोटकरी,किशोर भास्कर ,सचिन दप्तरे महेश गायकवाड,शंतनू शिंदे,शरद मंडलिक,संदीप बच्छाव,अभिजीत राऊत,अभिषेख निकम यांनी विविध सूचना मांडल्या.या बैठकीला माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, माळी समाज सेवा समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर,सरचिटणीस हरिश्चंद्र विधाते, मंगला माळी,मंगला जाधव,प्रवीण जेजुरकर,मयूर मोटकरी,महेश गायकवाड,शंतनू शिंदे,भास्कर जेजुरकर,दिलीप जुन्नरे,कैलास सैनी, संतोष मौर्य, ,सचिन दप्तरे,राजेंद्र ताजने,रमेश गायकवाड,भाऊसाहेब पवार,संजय भडके,किशोर भास्कर,गणेश राखोंडे,बाळासाहेब वाघ,नंदकुमार येवलेकर,प्रवीण सुरसे,अशोक जाधव,संजय पुंड,देविदास खैरे,संदीप बच्छाव,विजया जाधव,प्रेमलता जुन्नरे,भारती शेलार,संजीवनी जाधव ,जगदीश ताजने,मिलिंद तांबे,शरद मंडलिक,विलास वाघ,अभिषेख निकम, अभिजीत राऊत यांच्यसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन मयूर मोटकरी यांनी तर आभार अभिषेख निकम यांनी मानले.
n
