October 8, 2026

वैद्यकीय अभ्यासक्रमातील पुत्रकामेष्टीयज्ञाचा उल्लेख वगळा:

0

वैद्यकीय अभ्यासक्रमातील पुत्रकामेष्टीयज्ञाचा उल्लेख वगळा अंनिसची आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे मागणी.nnमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भारतीय वैद्यकशास्त्र (आयुर्वेद) शाखेच्या पदवी बी. ए. एम .एस. व पदव्युत्तर पदवी (एम. एस. प्रसूतीशास्त्र,स्रीरोग) अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना, पुत्र कामेष्टी यज्ञ व इच्छित पुत्र प्राप्ती कशी करावी, हे शिकवले जाते.nnत्यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसूती पूर्व गर्भधारणा निदान तंत्र या कायद्याचा भंग होत आहे . म्हणून ही बाब भारतीय संविधानाच्या पूर्णपणे विसंगत आहे, असे महाराष्ट्र अंनिसने निवेदनाद्वारे आरोग्य विद्यापीठाला कळविले आहे.nnनिवेदनात पुढे असेही म्हटले आहे की,nहा पाठ्यभाग सदर अभ्यासक्रमातून वगळण्याबाबत विद्यापीठाने त्यांच्या वरिष्ठांना तत्काळ अवगत करावे.nवास्तविक पीसीपी एनडीटी कायद्यान्वये निवृत्ती इंदुरीकर यांच्यावर दाखल असलेला गुन्हा पुढे चालवावा,असे स्पष्ट आदेश मा. सर्वोच्च न्यायालय यांनी नुकतेच पारीत केलेले आहेत.nnअसे असतानाही, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून मात्र अद्याप कालबाह्य व अवैज्ञानिक भाग वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवला जातो.nत्यामुळे लोकांचे अज्ञान वाढते व ते दैवादाकडे झुकतात.nसाहजिकच भोंदूगिरीला त्यामुळे बळ मिळते व ती फोफावते.nnम्हणून विद्यापीठाने आयुष मंत्रालयाला सदर अभ्यासक्रमातील पाठ्यांश वगळण्याबाबत तत्काळ कळवावे. त्यांच्यामार्फत सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ला कळवले जाईल आणि सदर अवैज्ञानिक, कालबाह्य भाग अभ्यासक्रमातून वगळला जाईल, अशा प्रकारची तजवीज तत्काळ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.nनिवेदनावर राज्य प्रधान सचिव डाॅ ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, डाॅ.सुदेश घोडेराव, राज्य सदस्य प्रल्हाद मिस्री, जिल्हा प्रधान सचिव नितिन बागूल यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *