राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा वाडा पर्यटनासाठी खुला करण्यात यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निवेदन राजमाता
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ऐतिहासिक कालीन वाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले .राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे व 3 ते 4 वर्षापासून राजमाता अहिल्यादेवी यांचा रंगमहाल बंद आहे. चांदवड शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल पर्यटकांना बघण्यासाठी सुरु करण्यात यावा. चादवड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक वास्तू चांदवड शहराची शोभा आहे. या ऐतिहासिक भव्य वाड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वास्तव्य होते. यामुळे या वाड्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. रंगमहालामुळे चांदवड शहराला ‘ऐतिहासिक गाव’ ही ओळख मिळाली आहे. रंगमहालाची रचना, बांधकाम, नक्षीकाम, कोरीवकाम बघण्यासाठी देश – विदेशातून असंख्य पर्यटक रंगमहाल बघण्यासाठी येतात, रंगमहालाबद्दल जाणून घेण्यासाठी येतात. परंतु, रंगमहाल बंद असल्याने त्यांचा हिरमोड होतो व त्यांना रंगमहाल न बघताच येथून नाराज होऊन परत जावे लागते. असंख्य पर्यटक मोठ्या श्रद्धेने रंगमहाल बघण्यासाठी येतात. परंतु, रंगमहालाचे बंद दरवाजे बघूनच त्यांना निघून जावे लागते. रंगमहाल पर्यटकांसाठी सुरु करण्यात यावा व या रंगमहालाचे जतन व संवर्धन करावे. पुरातन खात्यानेही रंगमहालाचे संवर्धन करुन निगा राखावी. ऐतिहासिक पुरातन वास्तू रंगमहाल लवकरात – लवकर पर्यटकांना बघण्यासाठी सुरु करण्यात यावा. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने रंगमहालासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.यावेळी व कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश रुपवते नाशिक
