शहरातील गुन्हेगारी हद्दपार करणारच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत
नाशिक शहरातील अंबड सातपूर आणि इंदिरानगर या वसाहतींमध्ये गुन्हेगारांनी वर डोकं काढला आहे दर दिवस आड एक खून हाफ मर्डर विनयभंग मुलींना पळवून नेण्याच्या घटना सुरू आहे. विशेषतः या हद्दीन मध्ये अवैद्य धंदे बंद असल्याचे पोलीस दादा सांगतात. अवैद्य धंदे बंद तर क्राइम वर कंट्रोल असा निष्कर्ष जर पोलीस काढत असतील तर तो सपशेल खोटा आहे. अवैद्य धंदा चालू असो या नसो घडायचा तो गुन्हा घडतोच. यावलट एका नवीन धंद्याने नाशिकमध्ये डोके वर काढले असून याच धंद्याला आळा घालण्याची आज गरज आहे एमडी पावडर सर्रास नाशिक मध्ये विकला जात आहे. एक ग्रॅम पावडर साडेतीन हजार रुपयाला मिळते धंद्याचा आवाका जर काढला तर शहरात एक करोड रुपयांच्या आसपास एमडी पावडर धंदा करते आणि याच धंद्यावरून खून होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची बदली करण्यात आली त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताच मोनिका राऊत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मोनिका राऊत यांचा पोलीस ताफा सध्या पाई पेट्रोलिंग करताना दिसत आहे पेट्रोलिंग करत असताना मोनिका राऊत स्वतः जनसामान्य जनतेशी संवाद साधतात नागरिकांना त्यांच्या अडचणी विचारतात. अशीच पद्धत परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त डी एस स्वामी अवलंबित असे त्याच धर्तीवर आता मोनिका राऊत काम करतात की काय असं सर्वसामान्यांना वाटू लागला आहे. डीसीपी मोनिका राऊत दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात निश्चितपणे त्या नाशिक मधली गुंडगिरी हद्दपार करतील असा विश्वास आता नागरिकांना येऊ लागला आहे. दहशत मोजणाऱ्या धुमाकूळ घालणाऱ्या गॅंग खून तलवार चोपर घेऊन फिरणारे सराईत गुन्हेगार यांना डीसीपी मोनिका राऊत चांगलाच धडा शिकवतील असं आता वाटू लागला आहे. टीम राऊत म्हणजे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ इंदिरा नगरचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार नाशिक रोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांजळे आदींनी गुन्हेगारांच्या विरोधात कंबर कसली आहे.
