राज्य सरकार व मुख्यमंत्री शेतकऱ्यांना वेड्यात काढतात : आदित्य ठाकरे
उद्धव गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्यावर होता. निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. सध्या शेतकरी राजा आर्थिक संकटात आहे असे असताना सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळावी म्हणून आम्ही ओरडतो मात्र सरकार त्याकडे कानाडोळा करीत करायची शेतकऱ्यांची बोळवत करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असे शेतकऱ्यांना बोलून दाखवले. महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री आहे पण एकही उपयोगाचा नाही असं मत शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला. शेतकरी आहे तर सरकार आहे शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारने जाणून घेतल्या पाहिजे अन्यथा मतदानातून सरकारला शेतकरी त्यांची जागा दाखवेल. माणूस पोसण्यापेक्षा कांदा पिकवणे अवघड झाला आहे असाही मत शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतकरी आपल्या कामाचा पैसा मागतो त्याच्या हक्काचे पैसे केंद्र सरकारने व राज्य सरकारने मंजूर करावेत अशी खंत शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे व्यक्त केली.nnhttps://youtu.be/dTOIb4A6U_8nnआदित्य ठाकरे तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आलात शेतकऱ्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. टोमॅटो कांदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा आदित्य ठाकरेंकडे शेतकऱ्यांनी मांडल्या ज्यावेळी निफाड येथील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक
