बिकट परिस्थितीतून झालेला अधिकारी : डॉ.कोल्हे
ज्याच्या नावात प्रभू श्री राम व माता सीतेचे नाव आहे असा पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस उपायुक्त म्हणून नाशिककरांना लाभला आहे. ज्यांचे नाव सिताराम कोल्हे. अतिशय खडतर परिस्थितीत सिताराम कोल्हे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता यशाचं कोणतही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल तर खडतर परिस्थिती वर मात करून आपण सहज यश प्राप्त करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे डॉ.सिताराम कोल्हे आहेत.nnhttps://youtu.be/66kdeUrJ_OEnnआपल्या कुशल कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढवणारा हा आपल्या कामाने प्रतिबिंब उमटवणारा अधिकारी सध्या नाशिक मध्ये एसीपी म्हणून कार्यरत आहे. सिताराम कोल्हे यांना गेल्या महिन्यात राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले आहे. डॉक्टर सिताराम कोल्हे सांगतात माझ्याकडे परीक्षेचा फॉर्म भरण्याची पैसे नव्हते. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचा प्रत्यय सिताराम कोल्हे यांना आला आहे. आपल्या मनात जिद्द आणि चिकाटी जर असेल ना तर खडतर परिस्थिती वर मात करून आपण सहज यश प्राप्त करू शकतो. डॉ. सिताराम कोल्हे यांचा आजपर्यंतचा प्रवास अतिशय थरारक आहे. खडतर परिस्थितीत त्यांनी यशाला गवसणी घातलेली आहे. नाशिकमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले सध्या ऐ.सि.पी म्हणून डॉक्टर सीताराम कोल्हे कार्यरत आहेत. दि हिंद न्यूज सतीश रूपवते नाशिक
