August 8, 2026

नाशिक मध्ये दोन्ही समाजाचा ऐतिहासिक निर्णय.

0

सामाजिक सलोखा टिकवणे भारतीय नागरिकांच्या हातात आहे. हे अनेक वेळा सिद्ध झाला आहे. काही समाजकंटक जातीयतेची लढाई लावून माझ्या पाहत बसतात किंबहुना त्यात त्यांचं राजकारण शिस्त आणि सामान्य जनतेचा बळी जातो. हे कुठेतरी थांबायला हवे याच अनुषंगाने नाशिक मध्ये सामाजिक सलोखा टिकवण्याचे जिवंत उदाहरण आपल्याला बघायला मिळेल. 28 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद चा सन एकाच दिवशी येणार आहे. गणपती सारखेच इथे मिदाची ही मिरवणूक भव्य दिव्य असते. नाशिक शहरात ईद आणि गणपती मिरवणुकीचा मार्ग एकच असल्यामुळे पोलिसांसमोर पेज निर्माण झाला होता. मात्र संयुक्तिक बैठकीत या मिरवणूक मार्गावर तोडगा निघाला. 28 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाची मिरवणूक या मार्गाने घेण्यात येईल व 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद ची मिरवणूक याच मार्गाने प्रस्थान करेल. हे निर्णय पोलिसांसमोर मुस्लिम आणि हिंदू जनतेने ठरवले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व आमदार देवयानी फरांदे यांनी या बैठकीत हा तोडगा काढला आणि जनतेचे समाधान केले.nnhttps://youtu.be/BpSzPbbknDI?si=lntFZxatcXUoQpzUnnशुक्रवार 29 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुस्लिम समाजाचे वतीने सर्व स्तरावर सदर निर्णयाचा स्वागत करण्यात येत आहे. नाशिक शहर हा सुफी संताचा शहर असून दोन्ही समाज वर्षानुवर्षे जातीय सलोखा मोठ्या आदर्शाने जपत आहे. यापूर्वी ही असे सण उत्सवाचे निमित्ताने असेल सामंजस्याने निर्णय घेण्यात आहे. तरी ही आदर्श बाब सामन्य जनतेच्या निदर्शनास यावी म्हणून गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी बडी दर्गा, जुने नाशिक येते दुपारी 3:00 वा. दोन्ही सामाजातील मान्यवारांची एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रन्स आयोजित करण्यात आली आहे. सबब आपणास नम्र विनंती की सदर प्रेस कॉन्फ्रन्सला उपस्थित राहुन आम्हाला उपस्कृत करावे. दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *