August 9, 2026

सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्ते रुंदीकरण झालेच नाहीत दादा भुसे यांना निवेदन

0

देशाच्या विविध प्रांतामधुनं नागरिक रोजगारा निमित्त नाशिक मधे वास्तव्यास आहेत. कारखान्या मध्ये काम करणारे कामगार-कर्मचारी शिफ्ट वेळे नुसार घर ते कंपनी असा रोजच प्रवास करत आसतात. त्याच प्रमाणे कारखान्यात कच्चा व पक्क्या मालाची वाहतुक ने आण करण्यासाठी लाहन मोठ्या अवजड वाहनाची वाहतुक असते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कामगार/ अवजड़ वहाने तसेच पायी चालानारे महिला/पुरुष कामगार या रस्त्याने मोठ्या प्रमानात वर्दळ सुरू असते.nnऔद्योगिक वसाहतीत प्रामुख्याने बॉस कं. महिंद्रा कं. सिएट कं. कार्बन कॉर्पोरेशन कं. झेनित मेटाप्ल्स कं. राइट टाइट कं. एबीबी कं.नैश ग्रुप कं. महिंद्रा सोना कं. तसेच सिकॉप गाळे,डब्लू शेड गाळे अनेक ट्रांसपोर्ट सह अनेक लाहन मोठे उधोग सध्या स्थितित सुरु आहेतnnऔद्योगिक वसाहात निर्माण करते वेळी एम.आय डी.सी. कडून रस्ते, पाणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज आदि सुविधा दिल्या होत्या. परंतु आज जवळपास ४५ वर्षा नंतर नागरी सुविधा कमी पडत आहेत. लघु उद्योग (कारखाने) वाढल्या ने कामगार यांच्या संखेत तिप्पट प्रमाणात वाढ़ झाली आहे. सध्याचे(पूर्वी बनवलेल) रस्ते अरुंद आहेत. त्या मुळे रोज शिफ्ट ड्यूटी च्या वेळी अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याची नोंद सातपुर पोलिस स्टेशन मध्ये झालेली आहे.आठवड्याला किमान एक तरी आपघात होत असतो. आपघाता मधे अनेक लोकांना आपले प्राण गामवावे लागले आहेत. तर काही ना कायम स्वरूपी आपंगत्व आले आहे.nnनाशिक महानगर पालिकेला शहराच्या उत्पनाच्या ६०% महसुल हा कर रूपाने औद्योगिक वसाहती मधुन मिळत असतो औद्योगिक वसाहती मधील सध्याच्या रस्त्यांचे डांबरीकरण मनपा बंधकाम विभागा कडून करण्यात येत असते रस्त्याची देखभाल व दुरूस्त करने नागरी सुविधा उपलब्ध करून देने मनपा ची जबाबदारी असूनही मनपा प्रशासन औद्योगिक वसाहतीत सुविधा पुरवण्यास हेतु पुरस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे.तसेच आज पर्यन्त मनपा प्रशासन स्तरावर सदर वस्तु स्थिती बाबत पुढाकार घेतला नाही ही अत्यंत खेद जनक बाब आहे तसेचnnकार्बन कंपनी च्या बाजूला कार्बन नाकायेथील व सिएट कंपनी समोरील नाल्या वरील पूल आहे २०११ साली पूलाला भगदाड पडल्याने ट्रक नाल्यात पडला होता, फुल जिर्ण व जुना झाला असल्याने आजच्या परिस्थितत नव्याने बांधकाम होणे अपेक्षित असून, त्याबाबत महानगरपालिकेला सदरबाब आम्ही निवेदनाद्वारे वेळोवेळी निदर्शनास आणून दिली होती पण त्यावर कुठलीही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही परिणामी “परिस्थिती जैसे थे “आहे येथे नागरिकांच्या जिविताचा विचारही केलेला दिसत नाही, रस्ता क्रमांक १६,१७ हा डीपी नकाशा मध्ये ३० मीटर रुंदीचा असल्याचे दिसून येत आहे सध्याचा उपलब्ध असलेल्या रस्ता हा खूप अरुंद असून वाहतुकीसाठी कमी पडत आहे औद्योगिक वसाहती मध्ये रोजच अपघात होतात. याची दखल घेऊनnnमाजी नगरसेविका ज्योती बजरंग शिंदे यांनी सन २०१०-२०११ च्या कार्यकाळात रस्ते रुंदी करण्याचा प्रस्ताव महासभा व स्थायी समिती वर ठराव मंजूर करून पुढील कारवाईसाठी सादर केला होता. परंतु नंतर मनपा प्रशासनाने याबाबतीत सकारात्मक पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सध्या नागरिकांना अपघाता सारख्या भयंकर संकटांना सामोरे जावे लागत आहे.nnसदर बाब गंभीर स्वरूपाची असून कामगार वर्गावर अन्याय करणारी आहे.मनपा आयुक्त यांनी या बाबतीत कारवाई न केल्याने सदर बाबतीत आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे बांधकाम मंत्री या नात्याने औद्योगिक क्षेत्रातील रस्ता क्रमांक १६ व १७ यांचे रुंदीकरण करून भविष्यात होणारी जीवित वित्तहानी टाळावी यासाठी आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कारवाई साठी आदेशीत करावे अविनाश शिंदे (नाशिक महानगर प्रमुख) बजरंग शिंदे (सातपूर विभाग प्रमुख) ज्योतीताई शिंदे (माजी नगरसेविका प्रकाश साळवे देविदास अहिरे कैलास सोनवणे संतोष जाधव प्रमोद वाघमारे अशोक वावळे आप्पा आव्हाड ज्ञानेश्वर बटावे दिनेश गोटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *