नाशिक पोलिसांची कारवाई सराईत गुन्हेगार युनिट एकच्या ताब्यात
- n
- नाशिक क्राईम युनिट एकच्या पथकाने सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सोनसाखळी, मोबाईल मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. नाशिक क्राईम युनिट एकला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विजय धमाल यांनी आपलं गुन्हे शाखेच्या पथकला बातमीची माहिती घेण्यास सांगितली. पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल,नाजीम खान पठाण, विशाल देवरे,प्रशांत मरकड या पथकाला संबंधित गुन्ह्याची माहिती घेण्यास सांगितली. त्यानुसार सराईत संशयित आरोपी अंबड परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने नफीज रफिक सय्यद वय 21 राहणार सिंहस्थ नगर सिडको नाशिक असे सांगितले त्याच्याकडून चोरीच्या मोटरसायकल मिळून आले आहेत. नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या इसमांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून महिलांच्या गळ्यातील साखळी खेचून पसार होत असे. संशयित नफिज रफिक सय्यद याच्याकडून चोरी केलेली काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल,गळ्यातील सोनसाखळी,मोबाईल असा ऐवज मिळून आला आहे. संशयित रफिक सय्यद याच्यावर भादवि कलम 392/379 /34, अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल होते त्याच्याकडून एक चैन तीन मोबाईल एक मोटरसायकल असा आवाज मिळून आला आहे. पुढील तपास नाशिक पोलीस करीत आहेत
n
