August 8, 2026

भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर अध्यक्षपदी जीवन गायकवाड यांची निवड.

0

भारतीय जनता पार्टी देवळाली कॅम्प शहर अध्यक्षपदी जीवन गायकवाड यांची निवड.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्पnnभारतीय जनता पार्टीच्या देवळाली कॅम्प शहराध्यक्षपदी जीवन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांच्या हस्ते व देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, जिल्हा सरचिटणीस शरद कासार जिल्हाचिटणीस कैलास गायकवाड, तालुका अध्यक्ष अतुल धनवटे, अरुण खांडबहाले, पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष वृक्षमित्र तानाजी भोर, सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष दिनकर पवार, प्रताप गायकवाड, प्रदीप गुरव या जेष्ठ पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांनी आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन आपापसातील मतभेद विसरून पक्षकार्य वाढवावे असे मार्गदर्शन गायकवाड यांच्यासह उपस्थितांना केले. या प्रसंगी बाळासाहेब केदारे, सोनू रामवानी, कैलास बकुरे, हेमंत गायकवाड, मंगेश उगले, मधुकर कापसे, राजू ओहोळ, प्रसाद आडके, शेखर कस्तुरे, राम गोडे, अर्जुन संगमनेरे, सुभाष निसाळ, संदीप पाळदे, विनोद डांगे, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा देवळाली कॅम्प शहराच्या वतीने जयंती अध्यक्ष संदीप शिंदे, समिती सदस्य संतोष घोडे, सुरेश पाटील, विनोद आवारे, भगवानदास कटारिया, छाया हाबडे, सुरेखा कुलथे आदींनी गायकवाड यांच्या निवडीचे स्वागत केले. आ. देवयानी फरांदे, आ.राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रा सुहास फरांदे, सुनील जाधव, बाबुशेठ कृष्णानी, सुनील गायधनी, अमोद शहाणे, विजय कुकरेजा, सतीश कांडेकर, तरुण पंजाबी, मार्टिन फर्नांडिस यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. भाजप देवळाली कॅम्प शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी देवळाली कॅम्प शहरातील सर्व समाजातील घटकांना एकत्र घेत लाभाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचून पक्षाचे कार्य वाढवणार आहे अशा भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *