श्री शिवपुराण कथा स्थळाचे मंडप भूमिपूजन संपन्न
श्री शिवपुराण कथा स्थळाचे मंडप भूमिपूजन संपन्न.आयोजक व ना. दादा भुसे यांच्याकडून भूमिपूजन,परिसरातील रहिवासीमध्ये उत्साह, चैतन्यnnप्रमोद रहाणे l नासिकnnनाशिकच्या पाथर्डी येथील दोंदे मळ्याजवळील भवानी माथा येथे श्री शिव महापुराण कथा उत्सव सेवा समितीच्या वतीने आयोजित श्री शिवमहापुराण स्थळाच्या मंडपाचे भूमिपूजन मंगळवार दिनांक १४ रोजी पालकमंत्री नामदार दादा भुसे यांच्यासह साधू संतांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन नाशिक येथे दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. यावेळी महंत भक्ती चरणदास महाराज व नाशिकचे पालकमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वा. भूमिपूजन करण्यात आले.nn nnनाशिक येथील भवानी माता मंदिर, दोंदे मळा, पाथर्डी गाव, येथे जाधव पेट्रोलपंप समोर भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११.३० वाजता श्री शिवपुराण कथा मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकचे नाव उत्तुंग शिखरावर पोहोचवू. हा धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम आहे. त्यात सर्वांचा सहभाग, सहकार्य अपेक्षित आहे. असे दादा भुसे यावेळी बोलताना म्हणाले. सदर कार्यक्रमाच्या नियोजना करता ३२ विविध समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्या मार्फत सर्व कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. असेही ना. भुसे म्हणाले. यावेळी खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, भाऊ चौधरी, लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, सुवर्णा मटाले, दिनकर पाटील, सचिन भोसले, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, अमोल जाधव, संजय नवले, शाम साबळे, दिनकर पाटील, निलेश गाढवे, अनिल ढिकले, धनंजय बेळे, प्रमोद लासुरे, रंजन ठाकरे, प्रशांत बच्छाव, भगवान दोंदे, सोमनाथ बोराडे, दुर्गेश चौधरी, चेतन चुंबळे, राम बडगुजर ,गणेश ठाकूर, दर्शन लड्डा, आदी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त वाहतूक शेखर देशमुख, सहाय्यक आयुक्त शेखर बारी, इंदिरा नगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, महानगर पालिका आयुक्त करंजकर व इतर अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.nnदरम्यान यापूर्वी श्री शिव महापुराण कथा मसरूळ त्यानंतर गामने मैदान येथे हा कार्यक्रम होणार होता मात्र भाविकांची होणारी अलोट गर्दी त्यांचे योग्य व्यवस्थापन या दृष्टिकोनातून त्या जागा योग्य नसल्याने आता सुमारे 25 एकर जागेवर पाथर्डी येथील दोंदे मळ्याजवळील भवानी माता ही जागा श्री महाशिवपुराण कथा सोहळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी मंडप आणि इतर सोयी सुविधांच्या कामास पाडव्याचे औचित्य साधून भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याविषयी नाशिक शहर आणि परिसरातील भाविक भक्त यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता, उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे.
