August 8, 2026

शिवसेना ठाकरे गटातर्फे नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबाला फराळ, कपडे वाटप.

0

शिवसेना ठाकरे गटातर्फे नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबाला फराळ, कपडे वाटपnवंजारवाडीतील गवारे कुटुंबाला दिपावली निमित्त भेट.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्पnनैसर्गिक आपत्तीमध्ये घरातील दोन व्यक्ती गमावलेल्या नाशिक तालुक्यातील वंजारवाडी गावच्या गवारे कुटुंबाची शिवसेना ठाकरे गट सैनिकांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांचे अश्रू पुसले. आणि घरकुल योजनेसाठी मदतीचे आश्वासनही दिले. वंजारवाडी येथील नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या गवारे कुटुंबातील मुलांना देवळाली मतदार संघाचे माजी आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते दिवाळीचा फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे या कुटुंबाला शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी वंजारवाडी गावातील गवारे कुटुंबांमधील छबु सिताराम गवारे व त्यांची पत्नी मंदाबाई छबु गवारे यांचा घराची भिंत पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. शासकीय पातळीवरून तातडीने त्यांच्या मुलांना घरकुल योजनेअंतर्गत पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन यंत्रणेने दिले होते. मात्र घटनेला १३ महिने होऊनही गवारे कुटुंब अद्यापपर्यंत पक्क्या घरापासून वंचितच राहिले आहे. शासनामार्फत त्यांना मदत होणे अपेक्षित असताना सामान्यांच्या उपयोगी सरकारी मदत मिळत नसेल तर विद्यमान राज्य शासनाचा काय उपयोग ? असा सवाल माजी आमदार योगेश घोलप यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारला. तसेच घरकुल योजनेत गवारे कुटुंबाला घर मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी भ्रमणध्वनी वरुन करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी सहकाऱ्यांसह त्यांच्या घराची संपूर्ण पाहणी केली. कुटुंबाची विचारपुस केली. तसेच मदतीचे आश्वासन गवारे कुटुंबाला दिले. फराळाचे पदार्थ तसेच कुटुंबातील मुलांना कपडे देऊन त्यांना दिपावली सणाचा आनंद दिला. यावेळी वैभव पाळदे, रोहित कासार, दत्ता पाळदे, गजीराम मुठाळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *