नाशिक जिल्ह्यात जोरदार बेमोसमी पाऊस शेतीमालाचे नुकसान
गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यात पुढील तीन ते चार दिवसात पाऊस येणार असल्याची खात्रीशीर यलो हवामान खात्याने दिला होता. रविवारी रात्री उशिरा नाशिक मध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली. नाशिक मधील कसबे सुकेने परिसरात बे मोसमी पाऊस कोसळा यात गारांचा वर्षाव होता. सिन्नर इगतपुरी भागातही पावसाने जोर धरला होता मुसळधार पाऊस झाला नाशिक मधल्या शहर परिसरातही बे मोसमी पाऊस कोसळला चांदोरी सिन्नर सायखेडा निफाड या भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या बे मोसमी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सरकारने लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
