August 9, 2026

साहित्यिक लेखक शंकरराव बोराडे यांचे निधन.

0

नाशिक । साहित्यिक, लेखक प्रा. डॉ. शंकर बोहाडे यांचे रविवारी (दि.२६) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शिक्षण, शेती क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.nnडॉ. बोऱ्हाडे हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय होते. त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह), उजेडा आधीचा काळोख (ललित), देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र), विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र), शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही पुस्तके आहेत. इन त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले. नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. त्यांचे बालपण सिन्नरमध्ये गेले. त्यांचे हलाक्याच्या परिस्थितीत शालेय शिक्षण झाले. त्यांना शिक्षणाची आवड होती. क्लार्क झाल्यावर त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले आणि ते शिक्षक, प्राध्यापक, पीएचडी, पीएचडीचे गाईड असा त्यांचा आयुष्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रवास राहिला. ते कोविडच्या आधी निवृत्त झाले. त्यांचे वाचन, लेखन आवडीचे विषय होते. सुरुवातीला त्यांनी पत्रकारीताही केली. ते राष्ट्र सेवा दलासह डाव्या चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *