August 9, 2026

देवदर्शन सत्कार आता गुन्हेगारांना चोप : पोलीस आयुक्त कर्णिक

0

नाशिक – सतिश रूपवते : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे देवदर्शन आटोपले सत्कार आटोपले आता ते गुन्हेगारांना दंडुक्याचा प्रसाद देणार. हाती आलेल्या माहितीनुसार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता कोंबिंग ऑपरेशन सुरू झाले आहे. लागोपाठ एकामागे एक असे दोन खून नाशिकमध्ये झाल्यानंतर नाशिक पोलीस आता कामाला लागले आहेत कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे मद्यपान करून रस्त्यावर टावळकी करणाऱ्या तळेरामांना देखील पोलिसांनी चांगलाच सोप दिला आहे. नाशिक शहरातील सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई सुरू करण्यात आली असून गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलीस रात्री च्या वेळी रस्त्यावर उतरून पोलिसिंग करणार आहेत. नाशिक शहरात पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जीवाचं रान करणार आहेत मध्ये पिठाळखोरांवर 151 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यापुढे गुन्हेगारांची गाय केली जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव परिमंडळ एकचे पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राऊत मॅडम तसेच पोलीस उपायुक्त खांडवी सात सहाय्यक पोलीस निरीक्षक 30 पोलीस निरीक्षक 125 उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक 1150 पोलिसांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *