August 8, 2026

आयटीआय पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंगेश मरकड यांची निवड

0

प्रमोद रहाणे l नाशिक.nnऔद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक जिल्हा या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत चेअरमनपदी मंगेश मरकड (प्रादेशिक कार्यालय, नाशिक) व्हाईस चेअरमन रवींद्र निकम, (आयटीआय कळवण) सेक्रेटरी केयूर टोणगावकर शा. तां. वि. नाशिक) खजिनदारपदी वसंत बोरसे, ( प्रादेशिक कार्यालय, नाशिक) यांची एकमताने निवड करण्यात आली.nया बैठकीस वरील पदाधिकाऱ्यांसह संजय पगारे, सौ. अलका गवळी, निखिल पिसे, सौ. मनीषा चव्हाणके आदी संचालक उपस्थित होते. आगामी काळामध्ये जास्तीत जास्त गतिमानतेने व पारदर्शक कामकाज करून संस्थेच्या सभासदांच्या हिताची जोपासना केली जाईल तसेच पतसंस्थेच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन मंगेश मरकड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *