टेकडीवरील कुस्ती दंगलीत जिंकला पिंपळगाव डुकराचा झनकर
प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प : -nnयेथील खंडोबा टेकडीवर चंपाषष्ठी निमित्त आयोजित यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली होती. पंचक्रोशीतील मल्लांच्या उपस्थितीत कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली.nnखंडोबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार मंगळवार दिनांक १९ रोजी कुस्त्यांची दंगल दुपारी साडे चार ते सहाच्या दरम्यान पार पडली. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या आखाड्यात पंचक्रोशीतील साकुर, पिंपळगाव डुकरा,भरवीर, भगूर, शिगवे बहुला, देवळाली कॅम्प येथील पहिलवानांनी सहभाग नोंदवला. रोख रक्कम १०१ ते साडेतीन हजार पर्यंत रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. अखेरची कुस्ती भगूर येथील अक्षय गायकवाड आणि पिंपळगाव डुकरा येथील श्रीकृष्ण झनकर यांच्यामध्ये झाली. सदर कुस्तीत निकाल डावावर पिंपळगाव डुकराच्या श्रीकृष्ण झनकर यास विजेता घोषित करण्यात आले. त्यास रोख रक्कम साडेतीन हजाराचे पारितोषिक व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. आखाड्यात भाऊसाहेब मोजाड आणि प्रवीण पाळदे यांनी पंचाची भूमिका पार पाडली. याप्रसंगी वस्ताद खंडू झाडे, सागर बर्डे, खंडू पवार आदिंसह कुस्तीशौकीन उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मल्हारीभक्त उत्तम मांडे, मंदिराचे पुजारी प्रकाश आमले, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, त्याचप्रमाणे भाऊसाहेब मोजाड, प्रवीण पाळदे, बेलतगव्हाणचे सरपंच मोहनिश दोंदे, सामाजिक कार्यकर्ते भारत वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
