August 8, 2026

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सर्रास झाडांची कत्तल.कत्तल

0

नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चक्क झाडांची विनापरवानगी कत्तल करण्यात आल्याची खबर जनक बाब उघड झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या पहिल्या गेटवर मारुती चेंबर आहे चेंबरला लागून एक छोटीशी कॅन्टीन आहे दोन ते तीन अतिशय जुनी म्हणजे शंभर वर्षांपूर्वीची झाड असावी. ही वृक्ष जुनी असून ती अतिशय डौलाने उभी होती. मात्र कोर्टाचा विस्तार करण्यासाठी ही वृक्ष विनापरवानगी तोडण्यात आले आहेत याची ट्रेमिंग कटिंग करण्यात आली आहे.nnhttps://youtu.be/OTWjWVu8YPg?si=bK_K_FMdzd_Z1J7pnnही घटना रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 ची असून यासंदर्भात कोर्टाला किंवा त्या परिसरातील शिपायाला देखील माहिती नाही की वृक्ष का तोडत आहेत. विस्तार करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते महापालिका रीतसर त्याला परवानगी देते मात्र न्यायालय आवारात विनापरवानगी जुनी वृक्ष कशी तोडली गेली ही बाब मेहरबान कोर्टाच्या लक्षात आली नाही का ? जिल्हा सत्र न्यायालय म्हणजे न्याय देणारी व्यवस्था आहे आणि न्याय देणाऱ्या व्यवस्थेनेच जर झाडांवर अन्याय केला तर ही बाब ही आहे असा आपल्याला वाटत नाही का ? सुट्टीच्या दिवशीच ही झालं का तोडण्यात आली हे झाड तोडण्या पाठीमागचा ठेकेदाराचा हेतू काय आहे . झाडे तोडताना परवानगी का घेतली नाही अशी सगळे प्रश्न आता नागरिकांना पडले आहेत. या संदर्भात मेहरबान कोर्टाचे अधिकारी चौकशी करतील का दोषी ठेकेदारावर झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करतील का हे पाहणं आता गरजेचं आहे दि हिंद न्यूज सतीश रूपवते नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *