October 6, 2026

देवळालीत दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न.

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :-nn”तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत, काखे झोळी, पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान असे गुणगान करून ” दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” च्या नामघोषात शहराच्या विविध भागात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.nnदेवळाली परिसरातील दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सव निमित्त भजन, पूजन, नामस्मरण, अभिषेक, आरती, महाप्रसाद वाटप असे भरगच्च कार्यक्रम पार पडले.nnशहरातील लेव्हीट मार्केट जवळ असलेल्या दत्त मंदिरात सकाळी संजय बलकवडे आणि सहकारी यांच्या हस्ते पूजा, अभिषेक करून महाआरती करण्यात आली. तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी आनंद खुळगे, प्रशांत निसाळ, सोनू रामवानी आदींसह लेव्हीट मार्केट परिसरातील व्यावसायिक उत्सव यशस्वीतेसठी प्रयत्नशील होते. खंडेराव टेकडी येथील दत्त मंदिरात अन्नाज टेम्पल हिल ग्रुप व खंडोबा मंदिर विश्वस्त यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नागेश देवाडिगा, सुरेश शेटे, रामनिवास सारडा, सचिन ठाकरे, विजय तिवारी, संजय आढाव, दत्तेश परदेशी आदीसंह भाविक तसेच ग्रुपचे सदस्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.nnवडनेर रोडवरील साई मंदिरात, सुखदेव जाधव, सचिन भागवत, सतीश कांडेकर आदींच्या हस्ते पूजा, अभिषेक, आरती करण्यात आली. यावेळी किरण भागवत, चंदू कोटीयन, प्रशांत यादव, कमल धामेजा, अशोक ग्रोवर, अमेय जाधव आदी उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. येथील पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरातही मूर्तीचे पूजन करण्यात आले. भाविकांनी सर्वच दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *