August 8, 2026

शेटे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची जीवनशैली, आरोग्य विषयावर व्याख्यान संपन्न

0

 nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय देवळाली कॅम्प, तसेच इनर व्हील क्लब ऑफ देवलाली कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची जीवनशैली व आरोग्यविषयक व्याख्यान पार पडले. मुंबई येथील डॉ सतिश नाईक यांनी विद्यार्थ्याना उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. मृत्युंजय कापसे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय व स्वागत राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ राजू सानप यांनी केले. या कार्यक्रमाला इंनर व्हील क्लब प्रमुख श्रीमती तोंडे, सेक्रेटरी श्रीमती भट्टाचार्य, श्रीमती मेहता उपस्थित होत्या.nnकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयीन कार्यकारिणी समिती सदस्य तसेच शिक्षण मंडळ भगूर संस्था सदस्य निवेदिता अथणी होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व व त्यांची निरोगी जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ.सतीश नाईक, मुंबई यांनी आपल्या व्याख्यानातून तरुण वयात होणाऱ्या डायबेटीस, ह्रदय रोग व त्यावरील काही उपाययोजना सांगितल्या. यावेळी बोलतांना ते म्हणाले की शरीर निरोगी असेल तरच मिळालेले यश टिकवता येईल. वाचनाची आवड, वेळेचे व्यवस्थापन, परिश्रम करण्याची जिद्द, चिकाटी, मोबाईल व टीव्ही पासून सावध रहावे. आरोग्य विषयावर त्यांनी अनमोल विचार मांडले. त्यानंतर इनरव्हील क्लबच्या सदस्या डॉ. भूतडा मॅडम यांनी आयुष्याचे निर्णय घेतांना येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी आईं वडिलांशी सुसंवाद आवश्यक असावा. या संदर्भात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ग्रंथाली प्रकाशनचे डॉ. महेश खरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.nnकार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता जोशी केले. आभार प्रा. सुरज गंगावणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद नोंदवला. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *