August 9, 2026

ति. झं. विद्यामंदिरात क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

0

प्रमोद रहाणे l भगुर :- ना. ए. सोसायटी संचलित ति. झं. विद्यामंदिर भगूर शाळेत वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.nnकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र शहा उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष विश्वास बोडके होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते यांनी केले. इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सौ. पेंडसे मॅडम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आडके मॅडम, माजी शिक्षक रत्नाकर बकरे, सोनवणे सर, माजी विद्यार्थी श्याम ढगे, शालेय शिक्षक प्रतिनिधी संजय आहेर, शालेय पंतप्रधान कश्यप शेख आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय सौ. कविता मराठे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. साधना काळे यांनी केले. पारितोषिक यादी वाचन नमस्कार शिंदे यांनी केले. सौ. जयश्री कातकाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. भरत भलकार, संदीप पाटील, कैलास टोपले, विलास कडाळे, सुनील शेटे, दिगंबर माळी, चीमा सापटे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *