August 9, 2026

भगूरात सरत्या वर्षाला निरोप मिसळपार्टीने दिला..

0

प्रमोद  रहाणे l भगुर :- येथील जनसेवक तसेच बारा बलुतेदार अठरापगड समाज संघटनेचे संस्थापक कैलास भोर यांनी रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. स्व. इंदिरा गांधी चौक येथे सकाळी ९ ते ११ दरम्यान पार पडलेल्या कार्यक्रमांत सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव यांनी आवर्जुन हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप देताना राजकीय हेवेदावे, मतभेद, मनभेद, वादविवाद मिटावेत, नूतन वर्षात सामाजिक ऐकोपा राहावा. गुण्यागोविंदाने आनंदाने सर्व ऐकत्र राहावे या उद्देशाने मिसळ पाव पार्टीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर यांनी केले होते. छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला. याप्रसंगी प्रमोद लासूरे, तानाजी करंजकर, गोरखनाथ बलकवडे, प्रताप गायकवाड, मंगेश करंजकर, प्रसाद आडके, मधुसूदन गायकवाड, विक्रम सोनवणे, विलास कुलकर्णी, शंकर करंजकर, विलास कासार, प्रमोद घुमरे, अनंत कापसे, रत्नाकर बकरे, चेतन बागडे, मनोज कुवर, राजेन्द्र शहा, प्रताप देशमुख, अमोल भागवत, संपत देशमुख, बंडू शिंदे, अनिल कासार, पत्रकार विलास भालेराव, भारत चव्हाण, बाळू शिंदे आदी उपस्थित होते. मिसळ पार्टी यशस्वीतेसाठी कैलास भोर, दिगंबर ससाणे, रवी आंबेकर, समाधान धात्रक, विवेक भागवत, मनोज कस्तुरे, अमित सुर्यवंशी, महेश जाधव आदी प्रयत्नशील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *