August 9, 2026

तैलिक महासभा महिला संघटनेची भगूर शहर कार्यकारिणी जाहिर.

0

तैलिक महासभा महिला संघटनेची भगूर शहर कार्यकारिणी जाहिर.nnप्रमोद रहाणे l भगूर :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष सौ. सुनीताताई बोरसे यांच्या उपस्थितीत संताजी मंगल कार्यालय भगूर येथे भगूर तेली समाजातील महिलांची सभा रविवार दि. ३१ रोजी पार पडली. सभेत पुढील प्रमाणे महिला कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षा सौ वैशाली सुनिल ससाने, उपाध्यक्ष सौ. प्रमिला संतोष वालझाडे, सौ. रेखा संदीप वालझाडे, कार्याध्यक्ष सौ. रेखा सुरेश शिंदे व सौ. सुरेखा शशिकांत कोरडे, सचिव मोहिनी दत्तात्रय वालझाडे, सहसचिव सौ. रेणुका मोहन गायकवाड, खजिनदार सौ.मनीषा घनशाम महाले, सौ योगिता नंदू मोरे, सह खजिनदार मीनाक्षी नंदकुमार गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख म्हणुन सौ.ज्योती कैलास भागवत, सौ प्राजक्ता कैलास बागडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी सौ. नूतन रमेश शिंदे, सौ वैशाली बाळू कस्तुरे, सौ.कल्पना सुनील गोरे, सौ. रूपाली पंकज वालझाडे, सौ ज्योती मोहन वालझाडे, सौ.ज्योती उमेश वालझाडे, सौ. योगिता शाम वालझाडे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. नूतन कार्यकारिणीचे समाजबांधवांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *