August 8, 2026

माध्यम क्षेत्रातील पत्रकार मंडळी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे : राजा उदाटे

0

 

nसतिश रूपवते नाशिकnnनाशिक ‘ आजच्या काळात माध्यम क्षेत्रातील पत्रकार मंडळी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप सारी आव्हाने उभे राहिले आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येत काम केलं पाहिजे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन तसेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रसार माध्यम पत्रकार संघ आयोजित आय एम हॉल येथे आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात अखिल भारतीय पत्रकार परिषद मुंबई अध्यक्ष राजा उदाटे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, मवीप्र संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, पुढारी संपादक मिलिंद सजगुरे, लोकंनामा संपादक जयंत महाजन , दैनिक तिरंगा संपादक सुरेश निकुंभ, चदन पुजाधिकरी आदी मान्यवर उपस्थतीत होते. यावेळी उदाटे म्हणाले की अखिल भारतीय पत्रकार परिषद राज्यात काम करत आहेत.पत्रकारांचे विविध प्रश्न मागण्या सोडवण्यासाठी काम करत आहे. त्याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्य, पेन्शन यासाठी राज्य सरकारकडे परिषद पाठपुरावा करत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार भवन कसे उभे राहील यासाठी देखील परिषद काम करत असल्याचे उदाटे यांनी सागितले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नसह आरोग्य, पेन्शन शहरात पत्रकार भवन उभारणीसाठी राज्य सरकारकडे जो पाठपुरावा करावा लागेल तो करण्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमंत्रक सतीश रूपवते, आयोजक गुलाब मणियार, संजय परमार, नितीन सातपुते आधीनी प्रयत्न केले सूत्रसंचालन अविनाश आहेर यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *