August 8, 2026

पत्रकारांच्या आरोग्यासाठी मविप्र सदैव तत्पर एडवोकेट नितीन ठाकरे

0

देवळालीकॅम्प- प्रमोद राहणे – लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या व जनमानसामध्ये आजही विश्वासहार्यता टिकून असलेल्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे यांनी केले.nnनाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने देवळालीतील सुभाष हायस्कूल च्या सभागृहात आयोजित कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप तर व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर , अभिनेत्री रसिका वाघारकर, माजी आ. योगेश घोलप शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला अभिनेते कृष्णा मरकड,गणेश महाराज करंजकर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे,नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.nnयाप्रसंगी अध्यक्ष भाषणातून बबनराव घोलप यांनी नाशिक मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या 26 वर्षापासून हा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकारांचे जीवन हे संघर्षमय असते तरी समाजाप्रती त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले. यावेळी विजय करंजकर,रतन चावला, रसिका वाघरकर यांची समायोचित भाषणे झाली. स्वागत अध्यक्ष सुनील पवार, प्रास्ताविक सुधाकर गोडसे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर तर आभार अरुण बिडवे यांनी मानले.nnयांचा झाला सन्मान # गोपाळ पालीवाल , निशिकांत पाटील, चंद्रमणी पटाईत ,विकास गामणे, जितेंद्र साठे, अमोल यादव, विवेक आहेरराव, मुकुंद बाविस्कर,, स्वप्नील येवले , दीपिका वाघ , दिनेश जाधव, किशोर मकासरे, डॉ. निलेश पाटील ,खुशाल पाटील , प्रमोद रहाणे, ऋतिक गणकवार, संदीप नवसे, यांसह वृत्तपत्र विक्रेते संपदा फडके, कृष्णाजी खैरनार , विलास गुंबाडे, आदींसह ,ग्रामपंचायत शिंदे, व लोहशिंगवे तसेच राजपार्वती फाउंडेशन (गिरणारे ),सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती (देवळाली कॅम्प), ,म्हसरूळ सार्वजनिक वाचनालय,nnसावन कृपाल रुहानी मिशन (देवळाली कॅम्प), विजया लिलके-चतुर (शैक्षणिक), दारणेश्वर महादेव देवस्थानम-पळसे,श्री ईच्छापूर्ती शिव मंदिर समिती लहवित रोड ,निलेश धोंगडे (क्रीडा), गणेश कुवर ,किशन अहुजा, संजय भालेराव, पंकज शेलार (सामाजिक ), शालिनी पेखळे (साहस ), ज्ञानेश्वर ढिकले (कृषी), सागर कुलकर्णी (सांस्कृतिक),भाऊसाहेब शिरोळे (उद्योजक) आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण बिडवे,वसंत कहांडळ, अरुण तुपे प्रवीण आडके,दीपक कणसे,प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, नंदकुमार शेळके, प्रकाश उखाडे,संजय निकम, प्रमोद राहणे, उमेश देशमुख, भास्कर सोनवणे,नथुजी ढिकले, तुषार बिडवे, अक्षय पेखळे रवींद्र पाटील प्रयत्नशील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *