दगड, माती, विटा, पर्यावरण पुरक वस्तूंचा वापर करून दुर्ग निर्मिती.
देवळाली महोत्सवात विद्यार्थ्यांनी साकारले २६ गडकिल्ले.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास व त्या काळी किल्ले बनविण्यासाठी लागणारी मेहनत यांची जाणीव व्हावी. विद्यार्थ्यांना मोबाईलकडून मातीकडे नेण्यासाठी देवळाली महोत्सवांतर्गत गड, किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत भगुर देवळाली परिसरातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आणि आपले कौशल्य पणाला लावून महाराष्ट्रातील विविध २६ किल्यांची चित्तवेधक निर्मिती केली.nnदेवळालीतील कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी किल्ले बनवा स्पर्धा पार पडली. स्पर्धेत आदर्श शिशु विहार, पोतदार इंटरनॅशनल, दर्शन अकाडमी, देवळाली हायस्कुल, नूतन विद्यामंदिर, वासूदेव अथनी इंग्रजी माध्यम, कॅन्टोन्मेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा, कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कुलच्या २५० विद्यार्थ्यांनी कलात्मकतेने सांघिकपणें प्रतापगड, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, रायगड, विजय दुर्ग, शिवनेरी, हरीहर गड सारख्या किल्ल्यांना आकार दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अनंतराव अथनी, सचिन ठाकरे, तानाजी करंजकर, बाबूशेठ कृष्णानी, संजय भालेराव, प्रमोद मोजाड, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य गीते, प्रशांत कोकणे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी विवेक बंड, माजी मुख्याध्यापक राजेंद्र यशवंते, मुख्याध्यापक विष्णू वाघ, मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी, पत्रकार प्रमोद राहाणे, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, अशोक गवळी यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यांचा उत्साह द्विगुणित केला. स्पर्धेचे परिक्षण सुप्रसिद्ध मूर्तिकार योगेश पाटोळे, कृष्णा लोखंडे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विविध शाळांच्या कला शिक्षकांसह आयोजक जीवन गायकवाड, हेमंत गायकवाड, नवनाथ झोंबाड, कैलास बकुरे, राहुल गायकवाड, दीपक आहिरे आदींसह देवळाली महोत्सव समितीचे सदस्य प्रयत्नशील होते.
