देवळाली रन’ ने देवळाली महोत्सवाचा समारोप
प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- देवळालीतील कलाकार व खेळाडूंना पर्वणी ठरलेल्या देवळाली महोत्सवाचा समारोप रविवार दि. ११ रोजी देवळाली रनसह विविध स्पर्धादरम्यान झालेल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून करण्यात आला.nnजुन्या बसस्थानक परिसरात देवळाली फेस्टिवलच्या ‘देवळाली रन ‘ ला सकाळी दानशूर उद्योजक महाराज बिरमानी, खा. हेमंत गोडसे, राष्ट्रपती पदकप्राप्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सेवानिवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव, मनपा माजी नगरसेवक शरद मोरे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू गणेश कुवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, डॉ.प्रिया वाविकर आदी मान्यवरांनी झेंडा दाखवून देवळाली रनचा शुभारंभ केला. या रनमध्ये १२, १४,१७ व खुला अशा गटात मुले व मुली अशी स्पर्धा पार पडली. त्यानंतर लगेचच पार पडलेल्या पारितोषिक वितरणप्रसंगी अध्यक्षस्थानी एकनाथ शेटे, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अभिनेता इंद्रनील कामत, बाबूशेठ कृष्णानी, खंडेराव मेढे, प्रा.सुनीता आडके, मंगेश गुप्ता, नितीन शिंदे, समाधान कासार, प्रवीण गायकवाड, मयूर पिंपळे, मीना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते चित्रकला, नृत्य, गड किल्ले व देवळाली रन मधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. रन मधील खुल्या गटात गोंदिया येथील कार्तिक कुमार व देवळालीतील आकांक्षा गोडसे हे विजेते ठरले. भगूर येथील आंतरराष्ट्रीय सायकलपटू गणेश कुवर यांनी ‘पॅरिस ब्रेस्ट पॅरिस’ हि स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल व दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी पार पडलेल्या आरडी परेड मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या मयूर पिंपळे यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन आयोजक जीवन गायकवाड यांनी केले. रन यशस्वीतेसाठी हेमंत गायकवाड, ताराचंद लहांगे, कैलास बकुरे, राहुल गायकवाड, राम गोडे, गोरख झोंबाड, अनिल भोर, मनोज कनोजिया, आकाश बोराडे, विनोद डांगे, रोशन वाजे, राकेश कलाल, दीपक आहिरे, नीरज ठाकूर यांचेसह परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक प्रयत्नशील होते.nnरनमधील विजेते स्पर्धक :- खुला गट (पुरुष) – प्रथम- कार्तिक कुमार, द्वितीय- दिनकर महाले , तृतीय- कृष्णा खुरकुटेnn१४ वयोगट (मुले) -प्रथम- भावेश परदेशी, द्वितीय- निलेश फडोळ, तृतीय- गगन कुमार.nn१७ वयोगट – प्रथम- सुरज माशी, द्वितीय- अंकुश बर्डे , तृतीय- सुरज दळवीnnखुला गट (मुली) – प्रथम- आकांक्षा गोडसे द्वितीय- नेहा फडोळ ,तृतीय- गायत्री महालेnn१४ वयोगट (मुली) – प्रथम- श्रुती चंद्रे, द्वितीय- पूजा शिंदे, तृतीय- प्रांजल उगले ,nn१७ वयोगट (मुली) -प्रथम- कोमल रोकडे , द्वितीय- आरोही बुरकुले, तृतीय- गौरी जाधव.
