देवळाली रेल्वेस्थानकाचा कायापालट.
पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात.nअमृत भारत योजनेतून स्थानकात अत्याधुनिक विकास कामे.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प : – केंद्र सरकारच्या रेल मंत्रालयाच्यावतीने अमृत भारत योजनेतून देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याने स्थानकाचा कायापालट झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसहिता लागण्यापूर्वी दूरदृष्य प्रणालीद्वारे स्थानकाचा लोकार्पण कार्यक्रम लवकरच पार पडणार असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक आर के कुठार यांनी दिली.nअमृत भारत योजने अंतर्गत रेल मंत्रालयाच्या वतीने भुसावळ डिव्हिजन मधील १५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. प्रवाशांना अत्याधुनिक, आरामदायी, सुसज्ज व्यवस्था पुरवण्याचा प्रयत्न या योजनेमार्फत केला जात आहे. त्याचबरोबर स्थानकाचे आकर्षक सुशोभीकरण देखील केले जात आहे. देवळाली रेल्वे स्थानकाच्या ब्रिटिश कालीन इमारतीचे मूळ स्वरूप कायम ठेवून पुनर्विकासाची विविध कामे केली जात आहे. त्यामध्ये प्लॅटफॉर्म सर्फेसिंग केबल ट्रेज, वॉटर, टॉयलेट, सर्क्युलेटिंग एरिया, मुख्य प्रवेशद्वार यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नवीन पादचारी पूल उभारण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मवर कोच डिस्प्ले बोर्ड लावण्यात आले आहेत. अत्याधुनिक उद्घोषणा यंत्रणा कार्यान्वीत केली जात आहे. वयोवृद्ध व दिव्यांग बांधवांसाठी प्लॅटफॉर्मवर लिफ्टची सुविधा लवकरच केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी खास रॅम्प, टॉयलेट, बाथरूम तयार करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकाला स्वागत कमान उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डोम असलेले एक आकर्षक प्रवेशद्वार पूर्णत्वाच्या दिशेने आहे. स्थानकाच्या बाहेरील जुने वृक्ष कायम ठेवून प्लॅटफॉर्मवर तसेच बाहेरील बाजूस आकर्षक फुल झाडे लावून उद्यानाची निर्मिती केली जात आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी तसेच लष्करी वाहनांसाठी व प्रवासी रिक्षांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. स्थानकाच्या बाहेरील बाजूस चार हाय मास्ट उभारण्याचे काम सुरू आहे. स्थानक परीसर सर्वत्र एलएडी दिव्यांनी लखलखनार आहे. स्थानकाबाहेर राष्ट्रध्वज लावण्यासाठी ६० फुटी स्तंभ उभारण्यात आला आहे. देवळाली स्थानकावर स्टेशन प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफीस, MCO ऑफीस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जात आहे. सीलिंग तसेच फर्निचरचे काम सुरू करण्यात आले आहे. स्थानकाच्या सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविले जाणार आहेत. रेल्वे स्थानकाच्या उत्पन्न वाढीसाठी देखील प्रयत्न केले जात आहे. त्या दृष्टिकोनातून काही विकास कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून नाशिकमध्ये येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांसाठी देवळाली रेल्वे स्थानकाचा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.nदरम्यान भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभाग रेल प्रबंधक इति पांडे यांनी ३ फेब्रुवारी रोजी देवळाली रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदारांना काम दर्जेदार आणि जलदगतीने पुर्ण करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत.nकोरोना पूर्वी देवळाली रेल्वे स्थानकावर २२ प्रवासी गाड्यांना थांबा होता. कोरोना काळात तो थांबा रद्द करण्यात आला होता. आता सध्या फक्त ७ गाड्या देवळाली रेल्वे स्थानकावर थांबत आहेत. त्यामध्ये पंचवटी एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, दादर अमृतसर एक्सप्रेस, देवळाली भुसावळ मेमो आणि इगतपुरी भुसावळ पॅसेंजर या ७ गाड्यांचा समावेश आहे. लष्करी हिताच्या दृष्टीने पंजाब मेलला थांबा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. इतरही प्रवासी रेल्वे गाड्यांना पुर्ववत थांबा दिला जावा असा जनमताचा रेटा आहे.nएकंदरीत पुनर्विकासाच्या कामामुळे देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाने कात टाकली आहे. सुशोभीकरणामुळे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाचा काया पालट होत आहे. स्थानकाची आकर्षक इमारत प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. देवळाली रेल्वे स्टेशनला पूनर्वैभव प्राप्त व्हावे हिच अपेक्षा.
