देवळालीत ढोलताशाच्या तालावर पालखी मिरवणूक
nnदेवळाली कॅम्प :- इंद्र जिमि जंभ पर, बाड सुअंभ पर, रावण संदभ पर,रघुकुल राज है ‘ , ‘ जय भवानी जय शिवाजी’ च्या ललकारीत ढोल ताशा पथकासह बॅण्डच्या तालात देवळालीत शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मान्यवरांसह शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी व नागरिकांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान करत व हाती भगवे झेंडे घेत रयतेचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आरती करत अभिवादन व शिवप्रसादाचे वाटप केले.nसर्व शिवप्रेमींनी पूर्वसंध्येला शनिवार दि.१८ रोजी मध्यरात्री येथील जुन्या बस स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या आकाराच्या व्यासपीठावर भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस समितीच्या पदाधिकारी यांनी अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, यांसह शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे, कार्याध्यक्ष प्रशांत कोकणे,उपाध्यक्ष रोशन गावंडे, पंकज चौधरी, खजिनदार निलेश सातपुते तर सरचिटणीस अक्षय गोडसे आदींसह सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन भव्य आतिषबाजी करण्यात आली. व त्यानंतर अभिनेते प्रसाद ओक यांची मुलाखत घेण्यात आली. त्यासोबत सुप्रसिद्ध शाहीर गणेश चंदनशिवे यशवंत जाधव यांनी विविध पोवाड्यांचे सादरीकरण केले तर नम्रता संभेराव पंढरीनाथ कांबळे विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर आदींनी हास्यकल्लोळ या कार्यक्रमातून विविध बहारदार विनोदी नाट्य सादरीकरण केले. सर्व कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देत सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते किरण भालेराव व पल्लवी कदम यांनी केले. तर काल सोमवार दि. १९ रोजी सकाळी येथील संसरी नाका येथून शिवसाम्राज्य ढोलपथक व बँडच्या तालावर भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी शिगवे बहुला येथील छत्रपती शिवाजी महाराज तालीम संघ व पैलवान पंढरीनाथ पाळदे व्यायामशाळा वतीने वस्ताद प्रवीण पाळदे, भाऊसाहेब मोजाड यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ यांचेसह मावळ्याची वेशभूषा परिधान केलेले कलाकार सहभागी झाले. जुन्या बस स्थानक परिसरात ढोलवादन होऊन महाआरती करण्यात आली. यावेळी मंगेश गावंडे यांनी समितीसह छत्रपती शिवाजी महाराज तालीम संघ यांना रुग्णवाहिका भेट दिली. व्यासपीठावर हौशी कलाकारांचे सादरीकरण झाले. दुपारी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. त्यानंतर निघालेल्या पालखी सोहळ्यात लहान मुलांसह तरुण व महिला भगिनींनी हाती भगवा झेंडा घेत विविध गीतांवर ताल धरला. समितीच्या वतीने दुपारी सर्व शिवभक्तांना भोजन देण्यात आले. सांयकाळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव,खंडेराव मेढे आदींच्या उपस्थितीत पुन्हाnमहाशिवआरती व त्यानंतर भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यशस्वीतेसाठी गोकुळ मोजाड, गोरख गावंडे, संदीप शिंदे, प्रमोद मोजाड, राहुल गीते,बंटी क्षीरसागर, राहुल मोजाड,उमेश निसाळ,अमित गावंडे,बंटी गावंडे, धीरज मोजाड आदींसह समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते.परिसरात क्रांती मित्र मंडळ संचालित सार्वजनिक वाचनालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय आदींच्या वतीने देखील प्रतिमापूजन करत अभिवादन करण्यात आले.जुन्या बस स्थानक परिसरात सामजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आर्यन फ्रेंड सर्कलच्या वतीने आलेल्या सर्व शिवभक्तांना मेन स्ट्रीटवर सकाळच्या सुमारास शेकडो उपस्थितांना पावभाजी तर भीमरत्न मित्र मंडळाच्या वतीने सरबत वाटप करण्यात आले.nn# लामरोडला शिवपुतळ्याचे पूजनnयेथील लामरोड शिवजन्मोत्सव समितीच्या उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य प्रीतम आढाव, माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे, सचिन ठाकरे, दिनकर पाटील, विलास धुर्जड आदींसह समितीचे अध्यक्ष महेश हारक,कार्याध्यक्ष दत्तू पाळदे,रवी कुटे,वैभव धुर्जड, संजय जाधव,किरण शिंदे, जय गोडसे आदींसह मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सरोज आहिरे व कामगार नेते जगदीश गोडसे यांनी भेट देत अभिवादन केले. यावेळी लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा, रात्री भव्य आतिषबाजी करण्यात आली. यशस्वीतेसाठी वैभव पाळदे,राजेश धुर्जड, राहुल धुर्जड, योगेश पाटोळे, सागर हारक, निलेश जाधव,गणेश जाधव,राजू देवकर, दत्तू मोरे आदींसह सदस्य प्रयत्नशील होते.
