नासाका विद्यालयात शिवविचारांचा जागर
नाशिकरोड:- नाशिक सहकारी कारखाना कार्यस्थळावरील नासिक सर्व सेवाभावी ट्रस्ट संचलित माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या भाषणे आणि काव्यगीतांच्या सादरीकरणातून शिवविचारांचा जागर करण्यात आला.nनासाकाचे अवसायक बबनराव गोडसे आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील बर्वे, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत खाणकरी, पालक योगेश आडके, दोन्ही विद्यालयांचे शिक्षक-कर्मचारीवृंद यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. रुचिका उगले हिने शिवगर्जना सादर करत वातावरणात चैतन्य निर्माण केले. धन्वंतरी गायधनी, ईशान सानप, वेदिका आडके, स्वरा गायधनी, समीक्षा शिरोळे, आरूष आडके, स्नेहल आडके, समृद्धी आडके, कोमल आडके, पराग शिरोळे, धनश्री सानप, वेदांत आडके, स्वरा आडके, धनश्री मोरे, सृष्टी आडके, रूपाली बनगर, वैष्णवी सानप, तनुजा बनगर, पायल सानप यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.nमानसी आडके आणि सहकारी यांनी शिवजन्माचा पाळणा, वेदिका आडके आणि सहकारी, शुचिता पिंपळे, चेतन गिते यांनी शिवगौरवगीते सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. शिक्षक माणिक भरसट आणि रवींद्र मालुंजकर यांनी पोवाडे सादर केले. कैलास लहांगे सूत्रसंचालन केले.nn
