August 9, 2026

इच्छापूर्ती शिव मंदिर समिती भगूरतर्फे महाशिवरात्री सोहळ्याचे आयोज

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- भगूर लहवित रोडवरील इच्छापूर्ती शिवमंदिर समितीच्या वतीने महाशिवरात्र निमित्ताने विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २ मार्च ते शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ दरम्यान महाशिवरात्री सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक गणेश निसाळ यांनी दिली.nदिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ वा. दरम्यान ह.भ.प गणेश महाराज करंजकर यांचे प्रवचन, ३ मार्चला पालक मेळावा, संस्कार मार्गदर्शन, ४ मार्च रोजी शिवपूजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन, ५ मार्चला औषधी वनस्पतींची माहिती व उपयोग, ६ मार्च रोजी सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन, ७ मार्च रोजी महिला दिन विशेष कार्यक्रम, ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता लघुरूद्र अभिषेक ह.भ.प. गणेश महाराज करंजकर यांच्या हस्ते होईल. सकाळी ९ वाजता महा आरती, महाप्रसाद वाटप, नंतर आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्र निमित्ताने २ मार्च ते ८ मार्च दरम्यान महिलांसाठी दुपारी ३ ते ४ पारायण, पुरूषांसाठी सायंकाळी साडेसात ते ९ अशी परायनाची वेळ ठरविण्यात आली आहे. शिवभक्तांसाठी ८ मार्चला दुपारी ४ वा.nरूद्रयाग पार पडणार आहे. पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ईच्छापूर्ती शिवमंदिर समितीचे समीर महाले, ललित भदे, प्रदीप फोकने, तुकाराम पाटोळे, स्वाती देशमुख, सरोज गायकवाड, भूषण निसाळ, तुषार चौधरी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *