तू भाजक नसल्यामुळे लॅम रोड परिसरात होत आहेत अपघात
लामरोडवर दुभाजकाची गरज, अपघाताच्या घटनेत वाढ, गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत. nnप्रतिनिधी l देवळाली कॅम्प:-गेल्या काही दिवसांपूर्वी लामरोडवर अपघातात एका स्विमिंग कोचचा मृत्यू झाला होता. जर या मार्गावर दुभाजक असते तर कदाचित समारोसमोर धडक होउन अपघात न होता हा शिक्षक अचानक आलेल्या या मृत्यूपासून वाचला असता. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भगूरसह तब्बल ५२ खेड्यापाड्यांना जोडणारा जिल्हा मार्ग असलेल्या या रस्त्यावरून दररोज शाळा, महाविद्यालय, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नाशिक शहराकडे कामानिमित्त ये-जा करणारे देवळालीसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची वर्दळ कायमच या रस्त्यावरून होत असते. मागील दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे आमदार यांच्या निधीतून रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. या शिवाय काही ठिकाणी गतिरोधक देखील असले तरी या रस्त्यावर कुठेही दुभाजक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे. येथील जमाल परिसरात बेला विस्टा बंगल्यासमोर दोन आठवड्यांपूर्वी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका स्विमिंग कोचचा मृत्यू झाला. इतरही अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे. यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने दुभाजक टाकण्याची मागणी येथील नागरिकानी केली आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते वैभव पाळदे यांच्या सह नागरिकांनी दिला आहे. -nnगतिरोधकांवर पांढरे पट्टे आखावे nnदोन वर्षांपूर्वी रस्ता बनवल्यानंतर काही गतिरोधकांवर पांढरे पट्टे आखण्यात आले होते आता मात्र ते पुसट झाल्याने रात्रीच्यावेळी दिसत नाही. व वाहनधारक कधी कधी या गतिरोधकांवरून आदळून खाली पडत आहे. त्यामुळे पुन्हा गतिरोधकांवर पांढरे पट्टे आखण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली असून गतिरोधकांच्या काही अंतर आधी ‘ पुढे गतिरोधक आहे ‘ अशा आशयाचे फलक लावण्याची मागणी देखील केली जात आहे.
