August 9, 2026

देवळालीत मोकळ्या भूखंडावर आगीचा भडका.

0

n

    n

  1. प्रतिनिधी l देवळाली कॅम्प :- येथील चारणवाडी रोड लगत असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आग भडकली होती. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अग्निशमन दलास घटना कळवली अग्निशमन दलाच्या पथकाचे संजय सकट, जयदिप निसाळ, भाऊसाहेब सानप यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा केल्याने आग विझवण्यात जवानांना यश मिळाले. सदरचा भुखंड अमजद खान यांचा असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग वेळीच विझवली नसती तर लगतच्या शेतात असलेल्या अरुण पुंडलिक गावंडे यांच्या गव्हाच्या पिकाला आगीची झळ पोचली असती. त्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली असती. मात्र सुदैवाने ती हानी टळली आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही.
  2. n

n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *