विजयनगरला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा.
nn*प्रमोद रहाणे* l *देवळाली कॅम्प* :- येथील विजयनगर भागातील श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरात शनिवार दिनांक 2 तसेच रविवार दिनांक 3 रोजी श्री गजानन महाराज यांचा १४६ वा प्रगट दिन विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा वाजे दरम्यान श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण करण्यात आले. दुपारी ४ ते ६ वाजे दरम्यान मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रविवार दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजेला गजानन महाराज मूर्तीस त्रिवेणी माळवे, किरण माळवे, श्रद्धा गुळवे, संजय गुळवे, आशा कानडे, अनिल कानडे, दुर्गेश कर्पे यांच्या हस्ते महाभिषेक, श्री सत्यनारायण पूजन व हवन करण्यात आले. त्यानंतर गजानन विजय ग्रंथातील प्रथम अध्यायाचे वाचन झाले. दुपारी १२ वाजेला महाआरती, दुपारी १ वाजेला महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ ते ९ वाजे दरम्यान नरेंद्र टोंगळे व सहकारी नाशिक यांचा “इंद्रायणी काठी” हा सुमधुर भक्ती गीतांचा कार्यक्रम पार पडला. सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ हजारो भाविक, भक्तांनी घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी रुपाली शहाणे, विद्या पगार, संगीता मांडे, पूनम गावडे, ज्योती घोलप, वंदना कर्पे, वर्षा कर्डक, कुसुम क्षत्रिय, दिनेश शहाणे, प्रमोद काळे, शंकर गावडे, मोहन खैरनार, कैलास वाघ, सुनील साळुंखे, प्रफुल इंगळे, अंबादास पाटील, गजीराम मुठाळ, शाम कुलथे, तसेच मुक्ताई भजनी मंडळ व श्री गजानन महाराज भक्त मंडळ विजयनगर यांनी परिश्रम घेतले.
