महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्काराने तेलोरेंचा गैरव.
नाशिक : सतिश रूपवते : महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देण्यात येतो. समाज भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे. समाजातील तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान केला जातो. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी पूर्णवेळ थांबून पुरस्कार त्यांचा गौरव केला पाहिजे मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडवणीस या कार्यक्रमाला वेळ न देता पाच मिनिटे थांबून पुरस्कार्थाची बोळवण केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमास पूर्णवेळ थांबवायचे नव्हते तर त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव कशासाठी केला. पुरस्कारार्थी मागासवर्गीय होते म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांनी तुच्छ तर लेखले नाही ना अशी हि चर्चा समाजामध्ये दबक्या आवाजात चालू आहे . याचा परिणाम येत्या निवडणुकीत बघायला मिळेल असे ही बोलले जात आहे. या पुरस्कार सोहळ्यास कैलास तेलोरे सहकुटुंब उपस्थित होते.कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा व युवक कल्याण मंत्री, संजय बनसोडे, ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांच्या प्रमुख उपस्थित होते . सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांच्या हस्ते कैलास तेलोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांनी केले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मानले कैलास तेलोरे यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . किरण लोखंडे, अविनाश गायकवाड, प्रशांत पगारे, मिलिंद निकम ,उमेश गजभिये , अँड. विनायक मेदगे डॉ .लियाकत नामोले, संजय पगारे ,भिका गांगुर्डे , अँड.राहुल तुपलोंढे,अण्णा भगत ,बिपिन मोहिते ,मनोज दोंदे, विशाल साळवे , अजय शिरसाट, बाळासाहेब घायवटे ,राजू बनसोडे ,दिनेश साळवे ,सचिन हिरे ,राजू चव्हाण ,अरुण आगळे, जगन सोनवणे,विनायक गांगुर्डे ,किरण निकम, गणेश घोडेराव ,शैलेश हांडोरे, सोनू बिडवे यांनी कैलास तेलोरे यांचे अभिनंदन केले आहे.
