October 7, 2026

महाठग सुशील पाटील एका वर्षात चौथ्यांदा पोलिसांच्या ताब्यात

0

मंत्र्याचा पीए असल्याची बतावणी करत सरकारी नोकरी मिळवून देतो असे सांगत एका ठगाने नाशिकच्या तिघांना तब्बल 80 लाख रुपयांना गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. सराईत महाठग सुशील पाटील वर पोलिसांनी एका वर्षात चौथ्यांदा अटक करण्याची कारवाई केली आहे. सुशील पाटील वर आता मोका लावण्याची तयारी नाशिक पोलीस करीत आहेत.nnयाबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुभाष सुरेश चेवले (वय 39) यांचे गंगापूर रोड वर आनंदवल्ली स्टॉप जवळ द्वारकामाई टेलिकॉम नावाचे दुकान आहे. त्यांची सुशील भालचंद्र पाटील (रा. लोचन अपार्टमेंट, मधूबन कॉलनी, पंचवटी) याच्याशी ओळख झाली.nnत्याने आपण मंत्र्याचा पीए असल्याचे चेवले यांना सांगितले. तुम्हाला व तुमच्या पत्नीला सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष त्याने दाखवले. चेवले आणि आणखी दोघांनी पाटीलला जानेवारी 2021 ते 13 मे 2023 या कालावधीत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी रोख स्वरूपात तब्बल 80 लाख रुपये दिले.nnत्याने त्यांना नियुक्ती पत्र देखील दिले. मात्र, ते बनावट असल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाले लक्षात आले. चेवले यांनी पाटील विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून यापूर्वीही त्याच्यावर फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल असल्याचे समजले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *