ऐका हो ऐका! दानपेटीतून 15 हजार चोरीला
नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ी नाशिक : मंदिराच्या दानपेटीत अमूक इतकी रक्कम होती आणि तेवढी रक्कम चोरीला गेली म्हणून या घटनेचा तपास करावा आणि चोराच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, असे साकडे पोलिसांना घालण्यात आले आहे. मुळात दानपेटीत अमूक इतकीच रक्कम होती, असे चोरी होण्याआधीच संबंधितांना माहिती कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यामुळे खरोखरच घटना घडली का, याविषयी संशयाचे धुके दाटले आहे.nघटना मातोरी गावातील आहे. याठिकाणी मातुलेश्वर मंदिर आहे. ग्रामदैवत असल्याने मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिरात चोरी झाले म्हणे. चोरट्यांनी दानपेटीत असलेले पंधरा हजार होते. मग या घटनेचा रितसर तपास करून चोरट्यांना अटक ,करा अशी मागणी संबंधितांनी तालुका पोलिस ठाण्याकडे करण्यात आली.nमुळात खरोखरच चोरीची घटना घडली का, असा प्रश्न गावातील काही सुज्ञ मंडळींना पडला आहे. कारण, ज्यांनी या घटनेचा तपास करण्याची मागणी केली, त्या संबंधितांनी दानपेटीत पंधरा हजार रूपये होते, असे पोलिसांना सांगितले आहे.nमुळात दानपेटीत नेमके पंधरा हजार रूपयेच होते, त्यापेक्षा एक रूपयाही कमी किंवा जास्त नव्हता, असे चोराला पकडण्याची मागणी करणारे ठामपणे कसे काय सांगू शकतात, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे, दानपेटी दररोज उघडून त्यात किती पैसे आहेत, हे मोजले जात होते, असा अर्थ काढला जात आहे. जर दानपेटी दररोज उघडली जात नसेल तर मग, चोरीची घटना घडलीच नाही, असा दुसरा अर्थ त्यातून काढला जात आहे. म्हणजे, घटनेचा बनाव केला जात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचा योग्य दिशेने तपास होणे गरजेचे असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.nnपरवानगी घेतली का?nरात्री मंदिराला कुलुप लावून ते सकाळी पुन्हा भक्तांसाठी खुले जात होते. मात्र मध्यंतरी मंदिर उघडण्यावरून वाद झाला होता. शहराला लागून असलेल्या या गावात अंतर्गत राजकारण केले जात आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात दानपेटी चोरीस गेल्याची घटना रंगविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच मंदिरात दानपेटी बसविण्यास आवश्यक असलेली परवानगी घेण्यात आली का, हाही प्रश्नच आहे.
