म्हणायला मिनी मंत्रालय; पाण्यासाठी मात्र वणवण
नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ी नाशिक : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत बसविण्यात आलेल्या कू लरमधून पाणीच येत नसल्याची तक्रार तहानेने व्याकूळ झालेले अभ्यांगतांनी केली आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयातील हे कुलर शोभेचे बाहुले बनले असून संताप व्यक्त केला जात आहे.nजिल्हा परिषदेत कामानिमित्त दररोज अनेकजण भेट देत असतात. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विविध विभागांशी निगडीत असणारे अभ्यांगत ग्रामीण भागातून येत असतात. अशा अभ्यांगतांसाठी पाण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. निदान तापमानाचा पारा चाळीशी पार झाल्याची बाब लक्षात घेऊन तरी संबंधितांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. या कामात प्रशासन मागे नाही. जुन्या इमारतीत जवळपास पाच कुलर बसविले आहेत. पण, या कूलरमधून पाणीच येत नसल्याचे अनुभव एका अभ्यांगताने मंगळवारी घेतला.nभर उन्हातून आल्याने तहानेने व्याकूळ झालेला हा अभ्यांगत प्राथमिक शिक्षण विभागात असलेला कूलर बघून सुखावला. तो पाणी घेण्यासाठी त्याठिकाणी गेला खरा पण, त्यातून थेंबभरही पाणी येत नसल्याचा अनुभव त्याला आला. पाण्याच्या शोधात संबंधित खालच्या मजल्यावरील बांधकाम विभागात गेला. तेथील कूलरचीही स्थिती फारशी वेगळी नव्हती. हाही कूलर बंदच आढळला. कै. रावसाहेब थोरात सभागृहाजवळ जूना कूलर असून अनेक दिवसांपासून बंद आहे. तसेच ज्या कुलरमध्ये पाणी आहे, पण, ते पिता येत नाही, अशी परिस्थिती आहे. कारण, पाणी पिण्यासाठी ग्लासच दिसून येत नाही.nपाठीमागे असलेल्या नवीन इमारतीत तर कूलरच दिसून येत नाही. याठिकाणी आल्यावर तहान लागली तर शोधूनही थेंबभर पाणी मिळणार नाही. कामानिमित्त येणार्या अभ्यांगतांना पाणी आहे का प्यायला, असे विचारावे लागते. कर्मचारी घरून पाणी बाटल्या घेऊन येत असून दिवसभर त्यांनाच ते पुरत नाही. किंबहुना दिवसभर पुरेल, अशा पध्दतीने बाटलीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. म्हणजे म्हणायला मिनी मंत्रालय असले तरी घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येते.
