August 7, 2026

कोयत्याने हल्ला करून एकाची हत्या

0

नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ीनाशिकरोड : मागील भांडणाचा राग मनात ठेऊन एकावर कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली.nयाप्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देवळाली गावातील सुंदरनगर येथील अरमान मुनवर शेख (वय 18) हा मंगळवारी (दि. 7) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रासोबत रोकडोबावाडीहून जय भवानी रोडकडे जात होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचताच गतिरोधकाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोर शेख याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढविला. त्यात पाठीवर, डोक्यावर वर्मी मार लागल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्याभोवती गर्दीही झाली होती. नागरिकांनी शेख याला औषधोपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले.मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदींनी घटनास्थळी व बिटको रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर संशयितांचा शोध सुरू केला.nगुन्हेशोध पथकाने पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत संशयीत गुंड्या, रवी राठोड व आकाश दिनकर या तिघांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *