August 7, 2026

नांदूरमध्यमेश्वर धरण कोरडेठाक; नागरिकांचे पाण्यासाठी हाल

0

नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ी लासलगाव : लिकेज, थकीत वीज बील अशा नानाविविध कारणामुळे सतत चर्चेत असलेली 16 गाव पाणीपुरवठा योजना आता नांदूरमध्यमेश्वर धरण कोरडेठाक झाल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.nआधीच भाजून काढणारे ऊन त्यात भीषण पाणीटंचाई, अशी परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे. मनुष्यांसह मुक्या प्राण्यांनाही जास्त पाण्याची गरज जाणवू लागलेली आहे.nपरिसरामध्ये असलेल्या विहिरी, बोअरवेलने तळ गाठल्याने त्याद्वारे होणारा पाणीपुरवठा देखील बंद झालेला आहे. त्यातच मागील 10-15 दिवसांपासून योजनेत समाविष्ठ असलेल्या गावांचा पाणीपुरवठा लिकेज आणि पंप नादुरुस्तीच्या कारणास्तव बंद होता. त्यामुळे लाभार्थी गावातील हजारो कुटुंबीयांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे. यामुळे 16 गांव पाणीपुरवठा योजनेतील गावांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.nपाणी टंचाईचे सावट दूर करण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी सोडण्यासाठी व पाणी आरक्षित ठेवण्यासाठी 16 गांव पाणी पुरवठा योजना देखभाल समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.nलासलगांव विंचूरसह 16 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्यावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेवर 16 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. सध्यस्थितीत धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे सदर योजनेचे धरणातील पंपिंग बंद झालेली आहे. त्यामुळे योजनेतील 16 गावांवर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. धरणामध्ये पाण्याचे आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी जयदत्त होळकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.nnपातळी 28 फूटnपाणी सोडल्यानंतर कालव्याचे आवर्तन बंद करतांना नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याच्या साठ्याची पातळी 28 फूट ठेवण्यात यावी जेणेकरुन पाऊस पडेपर्यंत पाणी टंचाई निर्माण होणार नाही. पाणी टंचाई निर्माण दूर करण्यासाठी धरणात पाणी सोडणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *