शिवसैनिकांसाठीच घेतला धाडसी निर्णय
नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ीनाशिक : एका खुर्चीसाठी शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होते. हे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हते. त्यातूनच बंड घडून आल्याचे सांगताना त्यांची मुख्यमंत्र्यांची सुप्त ईच्छा होती. त्या खुर्चीपायी, मोहापायी ते तिकडे गेले. बाळासाहेब असते तर त्यांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ दिले नसते. कारण बाळासाहेबांना त्यांची कुवत माहीत होती, असा घणाघात मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख न करता केला. बाळासाहेबांनी काँग्रेसच्या विचारांशी कधीच तडजोड केली नाही. ते नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले, असे ते म्हणाले.nयेथील मनोहर गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील शिवेसना (उबाठा) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, माजीमंत्री बबनराव घोलप, आ. सुहास कांदे, महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते व नाशिकचे संपर्कप्रमुख विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, ग्रमीण जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, गणेश कदम, शिवाजी भोर यांच्यासह पादधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्यक्ष नामोल्लेख न करता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, त्यांना खुर्चीचा मोह होता. त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांनाच तिलांजली दिली. ज्यांच्या विचारांशी बाळासाहेबांनी कधीच सूर जुळले नाही अशा काँग्रेसशी त्यांनी खुर्चीसाठी सलगी केली. मुख्यमंत्रिपदाचा त्यांच्या मोह-हव्यास होता. खुर्चीसाठी त्यांनी शिवसेनेची विचारधारा बाजूला केली. त्यामुळे सातत्याने शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होते. हे खच्चीकरण रोखण्यासाठी, शिवसेना वाचत्तिण्यासाञठी धाडसी निर्णय घतल्याचेही शिंदे म्हणाले.nज्यावेळेला प्रथम 40 आणि नंतर 10 आमदार एकत्र येऊन बंड करतात, निर्णय घेतात त्याला कारणही तसेच असेल ना, असा खडा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला. 13 खासदार आले, पदाधिकारी आले, नेते आले, कार्यकर्ते आले व येताहेत. त्यांना तिथे होणारे खच्चीकरण कळत होते म्हणूनच ना! बाळासाहेबांच्या विचारांना तिथं तिलांजली दिली जात होती म्हणून हे बंड घडून आल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. आम्हाला गद्दार, 50 खोके म्हणून हिणवलय जातं. खरा गद्दार कोण आहे हे जनता जाणते. खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना, तत्वांना तिलांजली त्यांनी दिली. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपशी गद्दारी केली. अशा गद्दारांना जनता क्षमा करणार नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्या जनतेने त्यांना मतपेटीतून नाकारले तर ते जनतेलाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत, अशी खिल्लीही शिंदे यांनी उठवली. बाळासाहेब सहकार्यांना सवंगडी समजत होते. हे तर घरगडी समजतात, असे सांगत राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक हे का बाजूला झाले, असाही प्रश्न उपस्थित केला. माझ्या वरचढ कोणी होणार तर नाही ना अशी भीती आणि ईर्षा त्यांना सतावत होती, असेही शिंदे यांनी सांगितले.nएकनाथ शिंदे यांनी सुमारे अर्धा तास पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ही निवडणूक देशाची आहे, असे सांगत मोदींचे हात बळकट करण्यसाठी हेमंत गोडसे यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहनही त्यांनी केले. राज्यातून महायुतीचे 45 उमेदवार विजयी होतील, असा विशवसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) अनेक पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत सतिती सदस्य, सरपंच, सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या मोळ्याचे आयोजन शिवसेनेत नव्यानेच दाखल झालेले विजय करंजकर यांनी केले होते. यावेळी विजय कारंजकर, पालकंमत्री दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा दोन ते अडीच तास उशिरा पोहोचूनही कार्यकर्त्यांचा उत्साह अमाप होता. महायुतीसाठी राज्यासह देशत चांगले वातावरण असून, आम्ही केवळ विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात असल्याचे शेवटी मुख्यमंत्री म्हणाले.
