August 8, 2026

बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

0

नाशिकnमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होऊन चोवीस उलटत नाही तोच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजाविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांना सात दिवसांचा वेळ देण्यात आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.nलोकसभेच्या निवडणुकीला ज्वर चढला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा शिंदे आणि ठाकरे या दोन गटात सामना होत आहे. शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यानंतरही त्यांनी प्रचाराला सुरूवात केली. त्याआधी ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी जाहीर करून टाकल्याने त्यांनी संपूर्ण मतदारसंघच पिंजून काढला आहे. प्रचारात आघाडी घेतल्याने महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. बारामती, पुणे आदी महत्वाच्या मतदारसंघात मतदानाचा टप्पा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिकवर लक्ष केंद्रित केले. बुधवारी नाशिकमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी पदाधिकार्‍यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी बडगुजर यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांचा समाचार घेतला. नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले विजय करंजकर यांनीही बडगुजर यांच्यावर तोंडसुख घेतले. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरून चोवीस होत नाही तोच बडगुजर यांना तडीपारीची नोटिस बजाविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाप्रमुख या नात्याने निवडणुकीची पूर्ण जबाबदारी सांभाळणार्‍या बडगुजर यांना नोटीस बजाविण्यात आल्याचा मुद्दा चांगलाच तापला असून ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान बडगुजर यांनी नोटीस स्वीकारली असून कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची वेळ देण्यात आली आहे.nnतडीपार नागरिकांना जो त्रास देतो त्या गुन्हेगाराला तडीपार केले जाते. मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेची सेवा करतो. ही कारवाई राजकीय हेतूने झाली आहे. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यातील नेत्यांनी काय काय स्टेटमेंट केलं त्याचं हे द्योतक आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात एकही केस नाही.आमच्यावर कारवाई करताना हेमंत गोडसे यांच्या बाबत कारवाई नाही. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले नाही.अनेकांवर गुन्हे दाखल पण त्यांच्यावर कारवाई नाही.nकालच्या सभेत जी मांडणी झाली त्याची अंमलबजावणी होत आहे. नोटीस घेतली, 10 दिवसांची वेळ मागितली. उद्धव साहेब काळजी करतात. सूड भावनेने ही कारवाई केली जात आहे. निवडणूक काळात इथे राहू नये यासाठी हा खटाटोप सुरू आहे.nसुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गटnn2014 मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात बडगुजर यांना शिक्षा झाली होती. त्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षा झालेल्या प्रकरणात ते कोर्टात गेले आहेत.कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी दहा दिवसांची मुदत मागण्यात आली.आम्ही त्यांना सात दिवसांची वेळ दिली आहेnमोनिका राऊत, पोलीस उपायुक्त झोन 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *