बिबट्याच्या हल्ल्यात बालकासह 12 जखमी
इगतपुरी : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पिंजरा लावत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एकूण बारा जण जखमी झाले. त्यात अकरा वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे.nउंबरकोन येथे बिबट्याच्या हल्ल्यात 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता. यावेळी बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण सारुक्ते असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. प्रवीण घरापासून दोनशे मिटर अंतरावर असलेल्या शेतात आई वडिलांबरोबर गेला असता उसाच्या शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आई वडिलांनी त्याचा आरडाओरडा करून बिबट्याचा प्रतिकार केला. बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविले. मात्र जाता जाता बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला. प्रवीण गंभीर जखमी असून त्याला घोटी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इगतपुरीचे प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रेस्कु ऑपरेशन राबविण्यात आले. मात्र बिबट्याला पकडत असतांना घटनास्थळी दोनशे ते तीनशे ग्रामस्थांनी गर्दी केल्यामुळे या नरभक्षक बिबट्याने वनरक्षकांच्या पाच कर्मचार्यांसह पाच ग्रामस्थांवर हल्ला करीत जखमी केले होते. अखेर या बिबट्याला पकडण्यासाठी नाशिक येथील डार्ट टीमला पाचारण करण्यात आले आहे. या कोम्बींग ऑपरेशन शोधमोहीमेत नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पश्चिम भाग नाशिक, सहा. वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथील जवळपास 130 अधिकारी व वन कर्मचारी सहभागी झाले होते. सायंकाळी ऊशीरा पर्यंत बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते.nहे झाले जखमीn1) कार्तिक सारूक्ते (वय 25 रा. उंबरकोन )2) सतीश सारूक्ते (वय-37 रा. उंबरकोन) 3) किसन सारूक्ते (वय-45 रा. उंबरकोन 4)यश बोराडे (वय-18,रा. दौंडत) 5) श्रावण चिमटे (वय 25) 6) राजाराम शिंदे (वय-31 , उंबरकोन) 7)फैज अली जाफर अली सय्यद (वय -30) 8) भाऊसाहेब राव (वय-51) 9) गोरख बागूल (वय-49) 10)विठ्ठल गावंडे (वय- 51) 11)चिंतामण गाडर (वय-33) 12)कैलास पोटींदे (वय-34) या सर्व जखमींवर घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. अविनाश गोरे, डॉ. संजना गायकर, यांच्यासह शितल पाटील, दिपक कुलकर्णी,दीपा कुलकर्णी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविले. रुग्णालयात आमदार हिरामण खोसकर व आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी भेट देऊन जखमींची विचापूस केली.
