August 7, 2026

पोलिस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत?: खा.राऊत

0

नाशिकnमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौन तासांच्या नाशिक दौर्‍यात पोलिस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत, असे व्टिट करून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, असे सूचक विधान केले आहे.nलोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली आहे. वाजे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे आधीच उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झालेल्या गोडसे यांना कधी मंत्री छगन भुजबळ तर कधी आमदार माणिक कोकाटे यांच्यासारख्या नाराजी नाट्याला सामोरे जावे लागत होते. फलकावर भुजबळ यांचे छायाचित्र न लावल्याने समता परिषदेच्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी गोडसे यांनी थेट भुजबळ फार्म गाठावे लागले. तर कोकाटे यांची नाराजी दूर करण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच हस्तक्षेप करावा लागला. नुसताच हस्तक्षेप करावा लागला नाही तर दोन दिवस त्यांनी नाशिक दौर्‍यावर येत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याच दौर्‍यात हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्यासोबत जड बँगा उचलणारे पोलिस दिसत असल्याचा व्हिडीओ खा. राऊत यांनी व्हायरल केला आहे. त्यावर ट्विटही केले आहे. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण. नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.नुसता पै पाऊस. दोन तासांच्या दौर्‍यासाठी पोलिस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला ? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करीत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे, अशा पध्दतीचे ट्विट राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.nnलोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. नगरमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षावर पैसे वाटप करीत असल्याचा आरोप आहे. त्यातच हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बॅगा घेऊन चालणारे पोलिस व्हिडीओत दिसत असल्याने आणि राऊत यांनी त्यावर ट्विटद्वारे थेट भाष्य केल्याने बँगांविषयी गूढ वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *