August 7, 2026

‘राज’ हल्ली नाशिकमध्ये दिसत नाहीत : पवार

0

नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ीनाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे नक्की काय स्थान आहे, हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडविली.nपवार यांनी पूर्वी अनेक राजकीय पक्ष फोडले. त्यामुळे आता त्यांचा पक्ष फुटला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्यावर नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.nपवार दोन दिवसांपासून नाशिक दौर्यावर आहेत. बुधवारी वणी येथे जाहीर सभा झाल्यानंतर गुरूवारी सटाणा येथे सभा घेतली. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.nयावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. हे करताना त्यांनी एक प्रसंग सांगितला. मला तुमच्यासोबत इस्रायलच्या दौर्यावर येण्याची इच्छा आहे, मला घेऊन चला, असे मोदी आपल्याला म्हणाले होते. ठरल्यानुसार मी त्यांना इस्रायलला घेऊन गेलोही. इस्रायलमध्ये कृषी तंत्रज्ञान आणि इतर सर्व गोष्टी सविस्तरपणे समजावून सांगितल्या. हे सर्व माहिती असताना आज मोदी जे बोलत आहेत, ते केवळ राजकारण आहे.nमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना राज्याच्या विकासात जेन्युईन इंटरेस्ट होता. पण आता त्यांचा जेन्यूईन इंटरेस्ट राजकारणात आहे. अशी टीका पवार यांनी केली.nमोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक आरक्षणाच्या मुद्यावरुन बोलत आहेत. मोदींचा आत्मविश्वास ढासळलाnअसून ते भरकटले असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.nमी राज्यभर फिरत आहे. महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. लोक बदलासाठी तयार आहेत. भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, हे मत विशेषत: शेतकरी वर्गाचे आहे. जनमत भाजपसोबत नाही, असेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *