रेल्वे बोगीतून धूर, प्रवाशांनी घाबरून मारल्या उड्या
नाशिक लोकल वृत्तसेवाnइगतपुरी : तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी समोर गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने गाडी थांबल्यावर गाडीतील प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्याची घटना घडली आहे.nयाबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला जाणारी गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शनिवार दि. 18 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने मोठा धूर निघाल्याने गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली होती. मात्र डब्या खालून धुर निघत असल्याचे पाहुन काही प्रवाशांची गाडीतून उड्या मारल्या. मात्र कोणतीही आग लागली नसल्याची खात्री झाल्यावर सदरची एक्सप्रेस इगतपुरीकडे रवाना करण्यात आली. गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीच्या बोगीच्या लायनरची दुरुस्ती करून गाडी मुंबईच्याnदिशेने रवाना झाली. यापूर्वी ही अशाच प्रकरचीnघटना झाली होती.
