मला खोट्या आरोपात अडकविण्याचा डाव – लक्ष्मी रवींद्र ताठे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा
10 जुलै रोजी नारकोडीक्स च्या गुन्हे अंतर्गत लक्ष्मी ताठे यांना तेलंगा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. सध्या लक्ष्मी ताठे जामिनावर बाहेर आहेत . ही अटक म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचे लक्ष्मी ताठे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.nलक्ष्मी ताठे या देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत. त्यापूर्वी शिंदे गटाच्या महिला नाशिक जिल्हाध्यक्ष होत्या. सध्या त्या विवेक फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. लक्ष्मी ताठे यांचा अनेक धार्मिक व सामाजिक कामांमध्ये सहभाग असतो . लक्ष्मी ताठे यांचे विरोधक कायमच त्यांच्यावर टपलेले असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल कशा पद्धतीने करते याचा षडयंत्र करीत असतात. असं लक्ष्मी ताठे उघड उघड बोलून दाखवतात. लक्ष्मी ताठे यांच्या विरोधकांना त्यांचं सामाजिक कार्य व प्रसिद्धी सहन होत नाही म्हणून त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती लक्ष्मी ताठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तेलंगणा राज्याची माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही व माझे तिथे कोणी समव्यवसायिक देखील नाहीत. तरीही धानोरा पोलीस स्टेशन येथे माझ्यावर एनडीपीएस खाली गुन्हा दाखल करून माझा मानसिक व कौटुंबिक छळ केला माझ्या कौटुंबिक जीवन उध्वस्त करण्यासाठी हे काम केले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मी महिला असल्याचा त्रास मला होतो हेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना आवर्जून सांगितले मला पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमांवर विश्वास आहे ते माझ्या अन्यायाला वाचा फोडतील अशी माझी अपेक्षा आहे मला न्यायव्यवस्थेने पोलीस प्रशासनाने आणि पत्रकारांनी सहकार्य करावे असे मत लक्ष्मी ताटे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
