October 7, 2026

अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने मातंग समाजाने काढली सन्मान रॅली

0

जलना प्रतिनिधी :- शहरातील गांधीचमन येथे जालना जिल्ह्यातील व परिसरातील हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधवांनी उपस्थित होत सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाला अनुमती दिली आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारने ही बाजू न्यायालयात मांडून न्याय देण्याचा जो प्रयत्न केला आहे. यासाठी सन्मान रॅली काढण्यात आली आहे. अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे, ही मागणी मागील कित्येक वर्षांपासून मातंग समाज बांधवांच्या नेत्यांची व समाजाची होती.अखेर सर्वोच्च न्यायालयाने, राज्य सरकारने व केंद्र सरकारने या मागणीला मान्य करत वर्गीकरणाची अनुमती दिल्याबद्दल शासनाचे व न्यायालयाचे आभार मानण्यासाठी तसेच जनजागरण करण्यासाठी या सन्मान रॅलीचे आयोजन सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने आज करण्यात आले होते, अशी माहिती मातंग समाजाचे नेते राजीव निकाळजे यांनी दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जी अनुमती दिली आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा लवकरात लवकर करावी, अशी मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली असून राज्यातील आमदारांना व खासदारांना त्यांनी इशारा सुद्धा दिला आहे, की लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. अन्यथा प्रत्येक आमदार व खासदाराच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *